लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवाराच्या भाग्याचा फैसला गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीने ठरणार आहे. प्रत्येकच मतदारसंघातील निकालाची उत्सुकता जनमाणसाला लागली आहे. विधानसभा मतदारसंघ मुख्यालयी मतमोजणी होणार आहे.सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर अनेकांनी तर्कवितर्क लावले. अगदी बुथनिहाय मतदानाच्या टक्केवारीवरून विजयाचे समीकरण कसे जुळले हे समर्थक व कार्यकर्ते चौकात रंगणाऱ्या चर्चेत सांगत होते. चुरशीच्या लढतीमुळे काही काळ सट्टा बाजारातही अनिश्चितता व शांतता पहायला मिळाली. त्याचाही आधार घेऊन विजयाचे आराखडे बनविण्यात आले. राज्यस्तरावरच्या एक्झिट पोलचा हवाला देऊन आपणच विजयी उमेदवार असल्याचा दावा अनेकांनी केला.गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदान केंद्राच्या संख्येवरून मतमोजणीच्या फेºया ठरल्या आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने येथे ३० मतमोजणीच्या फेºया होणार आहे. मोजणीची प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू झाल्यानंतर साधारणत: दुपारी ३ च्या पुढे जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे चित्र स्पष्ट होणार आहे. यवतमाळ, दिग्रस, पुसद या मतदारसंघांमध्ये कमी अधिक प्रमाणात थेट लढतीचे चित्र पहायला मिळाले. उमरखेड, वणी, आर्णी, राळेगाव येथे प्रबळ दावेदार रिंगणात असल्याने बहुरंगी लढत पहायला मिळाली. आता जनमताने कोणता कौल दिला यावरूनच या उत्सुकतेच्या ठरलेल्या लढतीचे निकाल हाती येणार आहे.मोबाईल अॅपवर निकालाचे अपडेटनिवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रिया ही ऑनलाईन केली आहे. मतमोजणीचा फेरीनिहाय निकालाचे अपडेट मोबाईल अॅपवर बघता येणार आहे. मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून व्होटर हेल्पलाईन हे अॅप डाऊनलोड केल्यास नागरिकांना घरबसल्या मतमोजणीचे अपडेट घेता येणार आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरूनही लाईव्ह निकाल पाहता येणार आहे. मतमोजणी केंद्राभोवती गर्दी टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Maharashtra Election 2019 ; विधानसभा निवडणुकीची आज होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:00 AM
सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर अनेकांनी तर्कवितर्क लावले.
ठळक मुद्दे८७ उमेदवारांचा फैसला : काऊंट-डाऊन सुरू, निकालाची उत्सुकता