शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Election 2019 : यवतमाळात सरासरी ५६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM

सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क्यांपुढे गेल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देग्रामीण भागात उत्साह : नगर परिषद क्षेत्रात सरासरी मतदान, दुपारनंतर वाढली मतदानाची गती, अनेक केंद्रांवर लागल्या होत्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभेत भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क्यांपुढे गेल्याचे सांगितले जाते.या विधानसभा मतदारसंघात दारव्हा तालुक्यातील लाडखेड व बोरीअरब या दोन जिल्हा परिषद सर्कलचा समावेश आहे. सर्वात शेवटचे गाव वडगाव(आंध) असून घाटंजी तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ विस्तारला आहे. येथील मतदारसंख्या तीन लाख ८४ हजार ७७२ इतकी असून यामध्ये ६० टक्के शहरी मतदार आहेत. हा मतदारच मतदान केंद्रावर आपल्या सोयीने पोहोचल्याने दुपारपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी कमीच होती. ग्रामीण भागात मात्र मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. साधारणत: ४ वाजतापासून मतदानाची गती वाढली. महागाव कसबा येथील मतदान केंद्रावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. यामुळेच विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान किती टक्के हा आकडा वृत्त लिहिपर्यंत मिळू शकला नाही. झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून अंतिम सरासरी ५६ टक्के राहणार असल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी व्यक्त केला.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद क्षेत्रात सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागतही करण्यात आले. सर्वच ठिकाणी पिण्याचे पाणी, व्हील चेअरची व्यवस्था ठेवण्यात आली होती. यवतमाळ विधानसभेत इव्हीएम बंद पडल्याच्या दोन तक्रारी आल्या. मात्र काही मिनिटातच तेथील मतदान सुरळीत करण्यात आले. एकंदरच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. 

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ