किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : दिग्रस विधानसभा मतदारसंघात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा लीड तोडण्याचे आव्हान विरोधकांपुढे सतत कायम राहिले आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीतही तोच अनुभव आला. तब्बल ६३ हजारावर मतांची आघाडी घेत विजय नोंदविणाऱ्या संजय राठोड यांना नेर तालुक्याने २२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य दिले आहे. ना. संजय राठोड यांनी एक लाख ३६ हजार ८२४, तर संजय देशमुख यांनी ७३ हजार २१७ मते घेतली.यावेळच्या निवडणुकीत लाखांवर मताधिक्य घेऊ असा दावा संजय राठोड यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांचा हा दावा प्रतिस्पर्धी तगडा असल्याने पूर्ण होऊ शकला नाही. दांडगा जनसंपर्क, विकास कामे, सामाजिक हिताची कामे या संजय राठोड यांच्या जमेच्या बाजू राहिल्या आहे. म्हणूनच त्यांनी हा दावाही तेवढ्याच ताकदीने केला होता.केलेला दावा प्रत्यक्षात उतरला नसला तरी त्यांची आघाडी मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराने घेतलेल्या जवळपास मतांएवढी आहे. संजय देशमुख यांनी विजय मिळविण्यासाठी आपल्या राजकीय कारकीर्दीतील अनुभवांचा उपयोग या निवडणुकीत केला. चित्रपट अभिनेत्यांना आणून गर्दी जमविली. दिग्रसचा निकाल यावेळी काही वेगळा असेल, अशा शर्यतीही लावल्या गेल्या. प्रत्यक्षात जे होणार होते तेच घडले.नेर तालुक्यात संजय राठोड यांनी पक्षाची केलेली बांधणीही त्यांच्या मतांच्या आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या तालुक्यात त्यांचे काही विरोधक सक्रिय झाले होते. मात्र या घरभेद्यांना अपेक्षित असे काहीही मिळाले नाही. दिग्रस, दारव्हा, नेर या तीन तालुक्यामिळून असलेल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात दारव्हानंतर नेरमध्ये २२ हजारांचा लीड संजय राठोड यांना मिळाला. दारव्हा २७ हजार, तर दिग्रसमध्ये १५ हजारांची आघाडी त्यांनी घेतली.विशेष म्हणजे, संजय देशमुख यांना दारव्हा आणि नेरचाच धाक होता. त्यांनी ही बाब बोलूनही दाखविली होती. नेरमध्ये नगरपरिषदेचे गटनेते पवन जयस्वाल यांनी स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करतानाच ना. संजय राठोड यांचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा सार्थ ठरविला. शिवसैनिकांची मेहनतही या तालुक्यात मोलाची ठरली. प्रत्येक कार्यकर्ता धडपडीने काम करताना दिसत होता.शिवसेनेचा बालेकिल्ला झालानेर तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता हा किल्ला शिवसेनेने ताब्यात घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या तालुक्याचा जणू संपर्कच तोडला आहे. नेते आणि जिल्ह्याचे पदाधिकारी अपवादानेच याठिकाणी फिरकतात. याउलट ना. संजय राठोड यांची फेरी नित्यनेमाने होते. कार्यकर्त्यांशी चर्चा, पदाधिकाऱ्यांसोबत सल्ला मसलत करतात. यामुळेच नेर तालुक्याने त्यांना भरभरून दिले असल्याचे बोलले जाते.
Maharashtra Election 2019 ; नेरने संजय राठोड यांना दिला २२ हजारांचा लीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 6:00 AM
यावेळच्या निवडणुकीत लाखांवर मताधिक्य घेऊ असा दावा संजय राठोड यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांचा हा दावा प्रतिस्पर्धी तगडा असल्याने पूर्ण होऊ शकला नाही. दांडगा जनसंपर्क, विकास कामे, सामाजिक हिताची कामे या संजय राठोड यांच्या जमेच्या बाजू राहिल्या आहे. म्हणूनच त्यांनी हा दावाही तेवढ्याच ताकदीने केला होता. केलेला दावा प्रत्यक्षात उतरला नसला तरी त्यांची आघाडी मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराने घेतलेल्या जवळपास मतांएवढी आहे.
ठळक मुद्देदिग्रस विधानसभा : घरभेद्यांना चांगलीच चपराक, प्रतिस्पर्ध्याचे तगडे आव्हान असतानाही लक्षणीय विजय