Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:03 PM2019-10-15T17:03:29+5:302019-10-15T17:04:11+5:30

नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत.

Maharashtra Election 2019 : Narendra Modi Adani-Ambani loud speaker | Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

Next

वणी (यवतमाळ) : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत. देशातील प्रत्येक मोठी कंपनी ते खासगीकरणाच्या नावाखाली या उद्योजकांच्या हवाली करीत आहे. एक दिवस संपूर्ण देश ते विकून टाकतील, असा घणाघती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. वणीसह यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील शासकीय मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदीजींनी देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील, असे आश्वासन दिले होते. ते मिळाले काय, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. सहा हजार रुपये भाव कापसाला दिला जात आहे काय, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारले. जनसमुदायाने त्यांच्या या प्रश्नाला प्रतिसाद देत एकसुरात नाही, असे उत्तर दिले.

नरेंद्र मोदी जेथे जातात, तेथे खोटे बोलतात. ते कधी चंद्राची गोष्ट करतात, तर कधी कलम 370च्या विषयावर चर्चा करतात. शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नावर मात्र त्यांचे मौन असते. गरिबांना लुटून अंबानी-अदानीचे खिसे भरण्याचे काम नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. या देशाची अर्थव्यवस्था अदानी-अंबानी नाही, तर देशातील सर्वसामान्य गरीब नागरिक चालवित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, हे काँग्रेसचे ध्येयधोरण आहे. परंतु नरेंद्र मोदींचा कारभार याऊलट सुरू आहे. ते अदानी-अंबानीचे स्पिकर बनून सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. सामान्यांचे लक्ष विचलित झाले की त्यांच्या खिशातून पैसे काढून ते अदानी-अंबानीच्या हवाली करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

यावेळी त्यांनी माध्यमांवरदेखील सडकून टीका केली. या देशातील प्रसारमाध्यमे केवळ नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात गुंतले आहेत. परंतु देश रसातळाला नेण्याचे काम करणा-या मोदींविरुद्ध माध्यमे एक शब्दही लिहायला व दाखवायला तयार नाहीत. हे सर्व प्रसारमाध्यमे देशातील करोडपती उद्योजकांच्या नियंत्रणात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी वणी विधानसभा मतदारसंघातील हजारो लोक उपस्थित होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माणिकराव ठाकरे, खासदार सुरेश धानोरकर, वणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वामनराव कासावार, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रकाश देवतळे, विजय खडसे आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 : Narendra Modi Adani-Ambani loud speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.