शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Maharashtra Election 2019 ; ‘गुन्हेगारीला राजकीय पाठबळ’ हाच यवतमाळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM

वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर आणि शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात तिरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत.भाजप यवतमाळ शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक या मुद्यावर होताना दिसत नाही. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे. शिवाय गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपकडून पलटवारही केला जात आहे.शिवसेना बंडखोर नेमके कुणाला ‘मायनस’ करणार याबाबत तर्क लावले जात आहे. मात्र त्यातून सामाजिक मतांमध्ये फूट पडण्याचा धोका काँग्रेसला अधिक वाटतो. विकासाच्या नावाने सर्वत्र झालेले खोदकाम व त्यातून शहराचा विद्रूप झालेला चेहरा पाहता हा विकास भाजपवर बुमरँग होण्याची चिन्हे आहे.जमेच्या बाजू

मदन येरावारपालकमंत्री म्हणून यवतमाळ शहरासाठी खेचून आणलेला कोट्यवधींचा विकास निधी, ३०२ कोटींची अमृत योजना, नगरपरिषद, जिल्हा परिषदेतील सत्ता, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला ३७ हजार मतांची आघाडी, शासकीय यंत्रणेवरील पकड, शहरी मतदारसंघ असल्याने भाजपची हक्काची मते, प्रचंड आर्थिक सुबत्ता, काश्मिरातील रद्द केलेले ३७० कलम, मोदींच्या नावाने मिळणारी मते, आमदारकीचा अनुभव.बाळासाहेब मांगुळकरजिल्हा परिषदेत दोन वेळा उपाध्यक्ष, सभापती, त्यातून जनतेची कामे करताना ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ, सर्व परिचित चेहरा, सामान्यांमध्ये असलेली आपुलकी, ग्रामीण भागात पक्षासोबतच स्वत:चे असलेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क, दलित, अल्पसंख्यक, मागासवर्गीय व ओबीसींचे भक्कम पाठबळ, काँग्रेसचा नवा सामान्य चेहरा, जनतेच्या संपर्कात, काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून घेतलेल परिश्रम, जनतेची सहानुभूती.उणे बाजू

मदन येरावार

दोन उन्हाळे जाऊनही अद्याप न पोहोचलेले बेंबळाचे पाणी, विकासाच्या नावाने शहरभर सर्वत्र झालेले खोदकाम, त्यातून विद्रूप झालेले शहर, ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, अवती-भोवती गुन्हेगारी जगतातील सदस्यांचा वावर, त्यांना सातत्याने दिले जाणारे राजकीय पाठबळ, त्यातून निर्माण झालेली जनतेची नाराजी, बिघडलेली प्रतिमा, दबावामुळे शासकीय यंत्रणेची नाराजी, जुन्या निष्ठावंत, प्रतिष्ठीतांनी साधलेला दुरावा.बाळासाहेब मांगुळकरजनतेच्या मनातील चेहरा असला तरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत, लोकवर्गणी करण्याची वेळ, तब्बल २३ वर्षानंतर विधानसभेच्या आखाड्यात, शिवसेनेच्या बंडखोरामुळे सामाजिक मतांमध्ये होणारे विभाजन, आर्थिक दृष्ट्या भक्कम असलेल्या उमेदवाराचे आव्हान, आघाडीत अद्यापही दिसत नसलेली एकजूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख गटाचा विरोधी सूर, त्यांची भाजपशी असलेली जवळीक, अल्पसंख्यकांमधील किंचित फूट.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ