लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘गांधी’ या नावाची जादू आजही भारतीयांच्या मनावर कायम आहे. याचाच प्रत्यय मंगळवारी वणीतील काँग्रेसच्या जाहीर सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.गांधी घराण्यातील नव्या दमाचे नेतृत्व आणि काँग्रेसचे शिर्षस्थ नेते म्हणून राहुल गांधी मंगळवारी वणीत येणार हे कळताच, हजारो सर्वसामान्यांची पावले शासकीय मैदानाकडे वळली. वणीत येण्यासाठी राहुल गांधी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचले. मात्र त्यांना ऐकण्याची उत्सुकता बाळगणाऱ्या हजारो नागरिकांनी वणीत सकाळी १० वाजतापासूनच गर्दी केली होती. दुपारी टळटळीत उन्हाने उकाडा वाढविला होता. पण लोक जागचे हलले नाही.गांधी नावाचे हे गारुड केवळ सामान्य मतदारांच्या मनावरच होते असे नव्हे, तर जिल्ह्यातील सारे काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही या सभेसाठी आवर्जुन हजर झाले.राहुल गांधी यांचे आगमन झाल्यावर तर ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असा घोष सुरू झाला. राहुल गांधी व्यासपीठावर येताच ही गर्दी तेवढ्यात उत्कंठेने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शांतही झाली. भाजपने मागील निवडणुकीत केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या का, असा एकेक सवाल राहुल गांधी उपस्थित करीत गेले आणि समोरच्या गर्दीनेही ताडताड् त्या घोषणा अर्धवटच राहिल्याचे मान्य केले. त्यामुळे राहुल गांधी यांचे जाहीर सभेतील हे भाषण एककल्ली न होता, तो परस्पर संवाद घडत गेला.वणी भागातील कोळसा खाणग्रस्तांच्या समस्यांचाही उहापोह त्यांनी केला. येथील शेतकरी आत्महत्या, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाची अवस्था याबाबतही पाच वर्षांत काय झाले, असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाच्या काळजाला हात घातला. राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे सर्वसामान्यांच्या दु:खावर फुंकर ठरली.
Maharashtra Election 2019 ; राहुल गांधींच्या सभेला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
राहुल गांधी यांचे आगमन झाल्यावर तर ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असा घोष सुरू झाला. राहुल गांधी व्यासपीठावर येताच ही गर्दी तेवढ्यात उत्कंठेने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शांतही झाली. भाजपने मागील निवडणुकीत केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या का, असा एकेक सवाल राहुल गांधी उपस्थित करीत गेले आणि समोरच्या गर्दीनेही ताडताड् त्या घोषणा अर्धवटच राहिल्याचे मान्य केले.
ठळक मुद्देवणीतील सभा : भाषण नव्हे, झाला संवाद