प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्यामुळे विधानसभेची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. दोन्ही उमेदवारांचे जातीय समीकरण तगडे आहे. मात्र खासदार भावना गवळी अद्याप अलिप्त दिसत आहे. त्यामुळे त्यांची अलिप्तता कुणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहे.खासदार भावना गवळी यांची संजय राठोड यांच्या प्रचारातील अलिप्तता शिवसैनिकांसह सर्वसामान्य मतदारांना बुचकळ्यात टाकत आहे. राठोड यांनी अर्ज दाखल करताना दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र शेवटपर्यंत खासदार गवळी पोहोचल्या नाही. त्यामुळे विविध प्रश्नांना पेव फुटले आहे. खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची अनुपस्थिती सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.लोकसभा निवडणुकीत संजय राठोड व खासदार गवळी यांच्यात दुरावा निर्माण झाला. तो आजतागायत कायम असल्याचे दिसून येते. खासदार शेवटपर्यंत अलिप्त राहिल्यास याचा फटका नेमका कुणाला बसणार, कुणाला लाभ होणार, याबाबत चर्चा झडत आहे.सर्वांनाच प्रतीक्षालोकसभा निवडणुकीत भावनातार्इंना जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली. आता या मतदारसंघातील भाजप, शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी भावनातार्इंच्या प्रतीक्षेत आहे. ताई येतात की अलिप्त राहतात याकडे नजरा आहे.
Maharashtra Election 2019 ; सेना खासदाराची चारही मतदारसंघांकडे पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:00 AM
खासदार भावना गवळी यांची संजय राठोड यांच्या प्रचारातील अलिप्तता शिवसैनिकांसह सर्वसामान्य मतदारांना बुचकळ्यात टाकत आहे. राठोड यांनी अर्ज दाखल करताना दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र शेवटपर्यंत खासदार गवळी पोहोचल्या नाही. त्यामुळे विविध प्रश्नांना पेव फुटले आहे.
ठळक मुद्देदिग्रस मतदारसंघ : विविध चर्चांना उधाण