शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Maharashtra Election 2019 ; मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM

वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक प्रक्रियेसाठी १ हजार ३८ वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क । यवतमाळ। जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षितरीत्या पार पडावी यासाठी झोन तयार करण्यात आले आहे. वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी दीड तास अगोदर मॉक पोल (अभिरुप मतदान) घेऊन मतदान यंत्राची पडताळणी केली जाणार आहे. दोन हजार ४९९ मतदान केंद्रावर २१ लाख ७५ हजार ६६५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.कडेकोट बंदोबस्त१,८५० स्थानिक पोलीस, १,१०१ होमगार्डस्, केंद्रीय दलाच्या ७ कंपनी तसेच राज्य राखीव दलाची एक कंपनी, लगतच्या तेलंगणा राज्यातून ६०० होमगार्ड, १ डीवायएसपी, ३० अधिकारी, ३८२ पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात केले जाणार आहे. एकूण ४,४०७ पोलीस आहेत.जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणारमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विधानसभा मुख्यालयी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का?सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अपर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवापासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक, पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ