शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Election 2019 : यवतमाळच्या तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, भाजप आमदाराची बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 4:22 AM

२०१४ मध्ये काँग्रेसकडून खेचून घेतलेल्या विधानसभेच्या पाच जागा यावेळी कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढती होत आहे. त्यात भाजपचे मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, मदन येरावार व संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.२०१४ मध्ये काँग्रेसकडून खेचून घेतलेल्या विधानसभेच्या पाच जागा यावेळी कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. या पाच पैकी आर्णीचे राजू तोडसाम व उमरखेडचे राजेंद्र नजरधने यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. नजरधनेंनी माघार घेतली असली तरी राजू तोडसाम यांची बंडखोरी कायम आहे. जिल्ह्यात भाजप पेक्षा अधिक शिवसेनेची पक्षबांधणी व ताकद असताना सात पैकी केवळ दिग्रस हा एकच परंपरागत मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आल्याने तमाम शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातूनच वणी, यवतमाळ व उमरखेड मतदारसंघात सेनेत बंडखोरी झाली आहे. मुंबईहून आलेले सेना नेते अनिल देसाई यांनाही ही बंडखोरी शमविता आली नाही. काँग्रेसने उमरखेड, आर्णी व यवतमाळमध्ये भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. राळेगाव व पुसदमध्ये दुरंगी, यवतमाळ, दिग्रस, उमरखेड, आर्णी येथे तिरंगी तर वणी मतदारसंघात पंचरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत. भाजपने यावेळी दोन उमेदवार बदलविले तर काँग्रेसने चार मतदारसंघात आपले जुनेच चेहरे कायम ठेवले. बंडखोरी व गटबाजी कुणाच्या पथ्थ्यावर पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) भाजपकडून ३७० कलम, हिंदुत्व, सेव्ह मेरीट या सारखे मुद्दे रेटले जात आहे. २) काँग्रेस-राष्टÑवादी बिघडलेले अर्थचक्र, मंदीची लाट, महागाई यावर जोर देते.३) जिल्ह्यात डबघाईस आलेले उद्योग, बेरोजगारीची समस्या हा मूळ मुद्दा आहे.४) शेतकऱ्यांची समस्या, शेतमालाला नसलेला भाव हे मुद्दे ग्रामीणमध्ये तापले.रंगतदार लढतीपुसद विधानसभा मतदारसंघातील लढत ही भाऊबंदकीत होत आहे. भाजपचे आमदार अ‍ॅड. नीलय नाईक आणि राष्टÑवादीचे विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांच्यात थेट सामना होतो आहे. दोन सख्खे चुलत भाऊ रिंगणात उतरले आहे.पालकमंत्री यवतमाळ मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचे आव्हान आहे. येथे शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडते हे महत्वाचे ठरते.एक लाख मतांची आघाडी घेऊन यावेळी निवडून येण्याचे स्वप्न रंगविणाºया महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांच्यापुढे भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी अचानक आव्हान उभे केले आहे. त्यामुळे लाखांवर मतांची आघाडी मिळविण्याचे राठोड यांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे असून निवडून येण्यासाठी त्यांंचा संघर्ष सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019