लोकमत न्यूज नेटवर्कवणी : स्थानिक पोलिसांनी पकडलेल्या तस्करीतील १८ लाख रुपयांच्या दारूचे मुख्य केंद्र पांढरकवडा असल्याची माहिती पुढे आली आहे. वणी पोलिसांनी एवढ्या मोठ्या दारू प्रकरणाचा तपास चालकावरच गुंडाळल्याचे दिसून येते.काही दिवसांपूर्वी वणी पोलिसांनी चंद्रपूरकडे जाणारा सुमारे १८ लाखांच्या दारूचा ट्रक पकडला होता. या प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांपुढे असल्याचे ‘लोकमत’ने सुरुवातीलाच वृत्तात नमूद केले होते. हे आव्हान ‘अर्थ’कारणापुढे पोलिसांना पेलवले नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातील एकूणच प्रगतीवरून दिसून येते. पोलिसांचा हा तपास ट्रक चालकापर्यंतच मर्यादित असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात मानोरा व यवतमाळातील ‘टीपी’धारक रेकॉर्डवर असले तरी प्रत्यक्षात हा माल पांढरकवडा येथून ट्रकमध्ये भरला गेल्याची माहिती आहे. अशाच पद्धतीने परस्पर वेगवेगळ्या नावाने ‘टीपी’ बनूवन पांढरकवड्यातून असे अनेक ट्रक नियमित चंद्रपूर, वर्धा या दारूप्रतिबंधित जिल्ह्यांमध्ये ‘पास’ होत असल्याचे सांगितले जाते.यवतमाळातील ‘टीपी’धारकाची तेथील बसस्थानक परिसरात भट्टी आहे, एका बिल्डींगचा मालक म्हणूनही या ‘टीपी’धारकाची ओळख आहे.मानोरातील ‘टीपी’धारकसुद्धा दारू व्यवसायातील असाच ‘प्रतिष्ठीत’ असल्याचे सांगण्यात येते. मालकांपर्यंत हात न लावता चालकावरच १८ लाखांच्या दारू तस्करीचे हे प्रकरण मिटविण्यासाठी मोठी ‘डिलींग’ झाल्याची चर्चा पोलीस दलात आहे. पांढरकवड्यातील दारुचा हा बडा पुरवठादार अलिकडेच ‘शाही’ कारभाराने चर्चेत आला होता.नगरचा ब्रॅन्ड, धुळ्यातून बदनाम : लोहारातील कारवाईने उघडमहिनाभरापूर्वी यवतमाळातील लोहाºयात दारूचा असाच एक ट्रक तेथील पोलिसांनी पकडला होता. तपासादरम्यान त्यातील दारू ही धुळ्यातील बनावट कारखान्यांमधून आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र दारूच्या या डब्यांवर नगरमधील एका नामांकित ब्रॅन्डचे नाव होते. पोलिसांनी सदर ब्रॅन्डकडे पत्रव्यवहार केला असता अनेक गंभीर बाबींचा खुलासा झाला. वर्षभरात आमच्या दारू निर्मितीचा बॅच नंबर १०५ ते ११० पेक्षा पुढे जात नसल्याचे या ब्रॅन्डच्या अधिकाºयाने पोलिसांना सांगितले होते. पत्रव्यवहार केला त्यावेळी त्या ब्रॅन्डचा बॅच नंबर ९३ सुरू होता. मात्र लोहारात जप्त केलेल्या दारूच्या मालावरील बॅच नंबर तब्बल २४५ नोंदविला होता. या जप्ती कारवाईदरम्यान सदर ब्रॅन्डच्या राजकीय वजन असलेल्या मालकाने थेट यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क करून वास्तव शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. अशा तस्करीमुळे आपला ब्रॅन्ड बदनाम होत असल्याचेही पोलिसांना सांगितले गेले होते. या राजकीय संपर्कामुळेच या दारू तस्करीतील पोलिसांचा दुसºयांदा पीसीआर घेण्यात आला होता, हे विशेष. मात्र नंतर हा तपास चालकाच्या पुढे गेला की तिथेच थांबला हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. लोहाºयातील या प्रकरणात चंद्रपुरातील वर्मा नामक व्यक्तीने पोलिसांना थेट ‘चौकार’ची आॅफर दिली होती, मात्र ‘बारा’ वाजवायचे असल्याने ही आॅफर धुडकावली गेली होती, अशी चर्चाही पोलीस दलात आहे.
१८ लाखांच्या दारू तस्करीचे मुख्य केंद्र पांढरकवडा शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:28 AM
स्थानिक पोलिसांनी पकडलेल्या तस्करीतील १८ लाख रुपयांच्या दारूचे मुख्य केंद्र पांढरकवडा असल्याची माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देकारवाई संथ : यवतमाळ, मानोराचे ‘टीपी’धारक मोकळेच