यवतमाळ : शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ३०२ कोटींच्या या योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. रविवारी रात्री ९.४५ वाजता वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तपासणीदरम्यान फुटली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
रस्त्यावरून अक्षरश: पाण्याचे लोट वाहू लागले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. जीवन प्राधिकरणाकडून नव्याने प केलेल्या पाणीपुरवठा योजनेची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये ठिकाणी पाईपलाईन प फुटत असल्याचे दिसून येते. २०१७ पासून सुरू असलेली ही पाणीपुरवठा त योजना अजूनही पूर्णत्वास आलेली नाही. रविवारी रात्री अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काशीकर महाराज मठ परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली.
घरातील वस्तूचे मोठे नुकसान झाले. पाणीच पाणी वाहू लागल्याने तपासणी करत असलेल्या कामगारांची सुद्धा तारांबळ उडाली, त्यांना काय करावे समजत नव्हते. पूर आल्याने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. पाणी घरात जाऊ नये म्हणून नागरिकांची धडपड सुरू होती. एकूणच प्राधिकरणाच्या कारभाराबद्दल परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पाईपलाईन फुटून आलेल्या पुरात झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.