यवतमाळ: सध्या कोरोनाची लस घेण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र पुढील काळात अत्यंत आवश्यक ठरणार असल्याने ते जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. (maintain the Corona Vaccine Certificate! Likely to be mandatory)आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रामध्ये सशुल्क कोरोना लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करत आहेत. मात्र, लस घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किंवा पोचपावती जपून ठेवण्याचीही गरज आहे.
प्रीमियमध्ये वाढ?नजिकच्या भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदींच्या वेळीही कोराेना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज भासण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्राशिवाय विम्याचा लाभ न मिळण्याची किंवा प्रीमियमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अधिकारी म्हणतात...- यासंदर्भात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा दिला. विशेषत: खासगी विमा कंपन्यांकडून मेडिक्लेम पाॅलिसीकरिता कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र मागितले जाणार आहे. - एलआयसीच्या जीवन आरोग्य विम्यासाठीही ते गरजेचे ठरणार आहे, असे एलआयसीच्या मार्केटिंग विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, वरिष्ठ शाखा प्रबंधक दिलेश बागडे म्हणाले की, सध्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक केलेले नाही. परंतु, गाईड लाईन बदलतात. यापुढे त्यात बदल होण्याची शक्यता आहे.