शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मैत्रेयचे गुंतवणूकदार कचेरीवर धडकले

By admin | Published: March 17, 2016 3:06 AM

खोटे आश्वासन देवून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉटर्स स्ट्रक्चर्स प्रा.लि. व मैत्रेय सर्वीसेस प्रा.लि.

यवतमाळ : खोटे आश्वासन देवून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉटर्स स्ट्रक्चर्स प्रा.लि. व मैत्रेय सर्वीसेस प्रा.लि. या कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी एजंट व गुंतवणूकदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. नगरसेवक दत्ता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या मैत्रेय अन्याय निवारण संघर्ष समितीच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. गुंतवणुकीच्या नावाखाली या कंपनीने जिल्ह्यातील हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. मॅच्युरिटीच्या तारखेला रकमेऐवजी धनादेश देण्यात आले. हे संपूर्ण धनादेश वटविले गेले नाहीत. यात नागरिकांची फसवणूक झाली. नागरिकांना रक्कम परत मिळावी आणि कंपनीच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, या मागणीसाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या आवाहनानुसार पहिल्या पाच दिवसात १२५१ गुंतवणूकदारांनी अर्ज केले. प्राप्त झालेले सर्व अर्ज आणि निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सोमवारी सादर करण्यात आले. मैत्रेय अन्याय निवारण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक नगरसेवक दत्ता कुळकर्णी, नगरसेवक अमोल देशमुख, कमल मिश्रा, प्रशांत दर्यापूरकर, सुहास सावरकर, राजू जेकब, अ‍ॅड. माटे, अविनाश धानेवार आदींनी निवेदन सादर केले. गुंतवणुकदारांची रक्कम त्वरित परत करावी, कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर आणि संचालक मंडळाला त्वरित अटक करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी एजंट, गुंतवणुकदारांची उपस्थिती होती. (वार्ताहर)