शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मजीप्राचे ‘तंत्र’ बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 9:53 PM

‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून यवतमाळ शहराला पिण्याचे मुबलक पाणी पुरविण्याची तयारी करीत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचेच ‘तंत्र’ बिघडले आहे.

ठळक मुद्देनवनवीन समस्या : अभियंते व कर्मचाºयांचा तुटवडा, तांत्रिक कामे विस्कळीत

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून यवतमाळ शहराला पिण्याचे मुबलक पाणी पुरविण्याची तयारी करीत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचेच ‘तंत्र’ बिघडले आहे. तांत्रिक कामांसाठी आवश्यक तेवढे अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने योजनेच्या कामांमध्ये विघ्न येत आहे. दररोज निर्माण होणारी नवनवीन समस्या निकाली काढताना कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.नवीन योजनांची कामे आणि जुन्या योजनांची देखभाल दुरुस्ती अतिशय तोकड्या यंत्रणेवर सुरू आहे. यवतमाळ शहर आणि पुसद तालुक्यातील माळपठार चाळीस गाव योजना या विभागाकडून चालविली जाते. व्याप मोठा असला तरी, आवश्यक तेवढा अधिकारी आणि कर्मचारीवर्ग याठिकाणी नाही. या विभागासाठी शाखा अभियंत्यांची १८ पदे मंजूर आहे. प्रत्यक्षात सहा अभियंते कार्यरत आहे. १२ अभियंत्यांचा तुटवडा आहे. शिवाय फिटर, पंप आॅपरेटर या प्रवर्गातील कर्मचारीच या विभागातून बाद झाले आहे. कंत्राटी पध्दतीने ही कामे भागविली जात आहे. या लोकांमध्ये अनुभवाची उणीव जाणवत आहे.यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जुन्या पाईपलाईन लिकेज आहे. व्हॉलमधून पाण्याची गळती सुरू आहे. मनुष्यबळ नसल्याने ही गळती वाढतच आहे. शहरात विकासकामे सुरू आहे. खोदकाम करताना पाईपलाईन फुटत आहे. वैयक्तिक नळ जोडण्याही तुटत आहे. दुरुस्तीची कामे तत्काळ होत नाही. त्यामुळे पाणी टंचाईत आणखी भर पडत आहे. शहराला आधीच आठ दिवसात एकदा पाणी मिळते. ऐनवेळी निर्माण झालेल्या तांत्रिक कारणांमुळे दिवस पुढे ढकलले जात आहे. लोकांच्या दररोज तक्रारी वाढत आहे. पुढील काही दिवसात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. अशावेळी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे.पाणीकराची वसुली मोहीमपाणीकराच्या थकीत वसुलीसाठी ‘मजीप्रा’ने मोहीम हाती घेतली आहे. कार्यकारी अभियंता अजय बेले यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात कर्मचारी वसुलीसाठी ग्राहकांशी संपर्क करीत आहे, तर दुपारी ३ ते ६ या वेळात कार्यालयीन कामे सांभाळत आहे. मोठी रक्कम थकीत असलेल्या ग्राहकांचे नळ कनेक्शन तोडले जात आहे. अवैधरीत्या घेतलेले कनेक्शन तोडून कारवाई करण्यात येत आहे. वसुलीसाठी नोटीस बजावून प्रसंगी जप्तीची कारवाई केली जाणार आहे. चापडोह आणि निळोणातून पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यांकडून मोटारपंप व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ‘मजीप्रा’ मंडळ अमरावतीचे सहायक आरेखक झोडपे, वरिष्ठ लिपिक सतीश फणसाळकर, प्रकाश पवार, विभागीय लेखापाल गोपाळ जीवने यांच्या उपस्थितीत नळ कनेक्शन बंदची कारवाई करण्यात आली. वसुलीसाठी नळधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी केले आहे.