शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

फटाकेविरहित दिवाळी करा

By admin | Published: November 11, 2015 1:55 AM

फटाक्याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षित करावे, ...

शिक्षण विभाग : अनेक शाळा-महाविद्यालयात दिली विद्यार्थ्यांना शपथयवतमाळ : फटाक्याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षित करावे, अशा प्रकारचे आदेश शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत. याबाबत शासनाने सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या आदेशाचाही संदर्भ जोडला आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने प्रसारमाध्यमांद्वारा याबाबत जनजागृती करावी. तसेच शिक्षक व प्राध्यापकांनी याबाबत विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत प्रशिक्षित करावे, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. सण, उत्सवप्रसंगी मोठ्या आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदूषणाचे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने १६ आॅक्टोबर २००१ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना ध्वनी व हवा प्रदूषणाचे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याबाबत निर्देश देण्याचे सूचित करण्यात आले आहे. फटाक्यांच्या वापरामुळे वायूप्रदूषण व ध्वनीप्रदूषण होऊन पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याने शक्यतो फटाक्यांचा वापर करू नये व फटाक्यांचा वापर करावयाचाच झाल्यास कमी शक्तीच्या फटाक्यांचा वापर करण्याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांचे मत परिवर्तन करण्याचे काम शिक्षकांनी करावे, त्यासाठी संबंधित शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी करावयाचे आहे. फटाक्याच्या आवाजामुळे व त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर होणारे एकूण दुष्परिणात विद्यार्थ्यांना सविस्तरपणे पटवून देऊन फटाक्यांबाबत वाटणारे आकर्षण कमी करण्याचे प्रयत्न करण्यात यावे आणि फटाक्यांचा वापर केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी तसेच फटाक्यांचा वापर करताना तो काळजीपूर्वक व जबाबदारीने कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना नियमातील तरतुदींची माहिती देण्यात यावी, असेही निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्येही फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये आम्ही फटाके वाजविणार नाही, अशा प्रकारची शपथसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आपण फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविले. यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबविला आहे. याचे चांगले परिणामसुद्धा दिसून आले. - सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.