पालकमंत्री : स्मार्ट ग्रामपंचायतींना पुरस्काराचे वितरणलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. या निधीचा सदुपयोग करून ग्रामपंचायती केवळ कागदोपत्री स्मार्ट न करता मॉडेल व्हिलेज करा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण भागाच्या विकासाचा राजमार्ग हा स्वच्छतेतून जातो. त्यामुळे स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्यनिर्मूलन, पर्यावरण संतुलन तसेच इतर बाबतीत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्मार्ट ग्राम पुरस्कार दिला जातो. जिल्ह्याच्या १६ तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना ना. मदन येरावार यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींमध्ये तळेगाव (ता.यवतमाळ), तिरझडा (ता.कळंब), कोलुरा (ता.नेर), पहूर (ता.बाभूळगाव), निंभा (ता.दारव्हा), रावेरी (ता.राळेगाव), साकूर (ता.आर्णी), नागापूर (ता.उमरखेड), खर्षी (ता.पुसद), रुई मोठी (ता.दिग्रस), कसारबेहळ (ता.महागाव), कुंभारी (ता.घाटंजी), कळंबवेल्ली (ता.झरीजामणी), देवाळा (ता.मारेगाव), सिंगलदीप (ता.पांढरकवडा), चिखली (ता.वणी) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायती मॉडेल व्हिलेज बनवा
By admin | Published: May 09, 2017 1:19 AM