लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सोयाबीन व कापसावर आलेल्या रोगामुळे यंदा शेती उत्पादनात घट झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . त्यामुळे येत्या वर्षात कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन व कापसाच्या नव्या जाती उपलब्ध करुन देणार असल्याची महिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी दिली.भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानाच्यावतीने आयोजित कृषी गौरव सन्मान समारंभात उदघाटक म्हणुन ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर होते. प्रमुख पाहुणे आमदार राजेंद्र नजरधने, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले, अतुल घुईखेडकर, नगराध्यक्ष नामदेव ससाने , डॉ दिलीप मानकर, दत्तात्रय काळे, कल्याणराव माने , महिंद्र ढवळे , डॉ. अरूण कुळकर्णी, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अशोक वानखेडे उपस्थीत होते. प्रास्ताविक डॉ विजय माने यांनी केले.कार्यक्रमात प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सुरेश पतंगराव अंबोडा, विठ्ठल चव्हाण इसवी, विद्या उजवने यवतमाळ, सौरभ ठाकरे वरुड, राजाराम एदलेवाड ढाणकी, गजानन केशववार आर्णी, डॉ. मुकुंद कदम नागपूर, डॉ नंदु भुते खामगांव, प्रभाकर देशमुख नागपूर, साहेबराव धात्रक उमरखेड, मृणाली देहकर यवतमाळ, विजय रेघाटे उमरखेड, योगेश पालीवाल यवतमाळ, प्रदीप देशमुख औरंगाबाद, नामदेव ढाकणे पोखरी हुडी, माजी आमदार विजय खडसे, नितीन भुतडा, संतोष गवळे, मुंकुद नरवाडे यांचा समावेश होता .संचलन सुधाकर वानखेडे यांनी तर आभार अरविंद ओझलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी आनंद गोविंदवार, आकाश माने, विवेक वास्कर, परमात्मा गरूडे, अॅड. बळीराम मुटकुळे, विजय आलट, डॉ.गणेश जाधव, सतिश वानखेडे, गजानन चव्हाण, बाळा शिंदे , सतिश शिलार, डॉ. विठ्ठल गोविंदवार यांनी परिश्रम घेतले.
सोयाबीन व कापसाचे नवीन वाण उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:27 PM
सोयाबीन व कापसावर आलेल्या रोगामुळे यंदा शेती उत्पादनात घट झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . त्यामुळे येत्या वर्षात कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन व कापसाच्या नव्या जाती उपलब्ध करुन देणार असल्याची महिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी दिली.
ठळक मुद्दे विलास भाले : उमरखेड येथे भाऊसाहेब माने प्रतिष्ठानातर्फे शेतकºयांना पुरस्कारांचे वितरण