आकाश कापसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमांगलादेवी : नेर तालुक्यातील माणिकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया मांगलादेवी येथील आरोग्य उपकेंद्र सलाईनवर आहे. मांगलादेवीसह लगतच्या मांगुळ, कुºहेगाव, चिखली(कान्होबा) या गावातील नागरिक याठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र त्यांना अनेकदा परत जावे लागते. उपचार झाले तरी प्रकृती ठीक होईल, याची खात्री नाही. या समस्येकडे परिसरातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे.लोकसंख्येच्यादृष्टीने मांगलादेवी हे नेर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावातील आरोग्य उपकेंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर देऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. हा प्रश्न निकाली निघणे तर दूर केवळ दोन आरोग्यसेविका आणि एक आरोग्यसेवक याठिकाणी सेवा देत होते. वर्षभरापूर्वी आरोग्यसेवकाला पदोन्नती मिळाली, तर एका आरोग्यसेविकेची बदली झाली. ही पदे आजपर्यंत रिक्त आहेत. सध्या कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका सेवा देत आहे. त्यांच्याकडे मांगलादेवीसह इतर गावांचा भार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा संपूर्ण ताण ‘आशा’वर आला आहे.या उपकेंद्राच्या इमारतीचा उपयोग केवळ लसीकरणाच्या दिवशीच होतो. इतर दिवशी सहसा कुलूपबंद असते. पावसाळ्याचे दिवस आहे. जलजन्य आजार तोंड वर काढत आहे. विविध प्रकारच्या आजाराने नागरिक त्रस्त आहे. अशावेळी या उपकेंद्राच्या आरोग्यविषयक सेवेचा लाभ नागरिकांना होत नाही. गरीब कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार केवळ आशांमुळे मिळत आहे. त्या ग्रामीण भागातील लोकांसाठी खºया अर्थाने आरोग्यदूत ठरल्या आहे.आशांवर वाढलेला भार कमी व्हावा यासाठी वरिष्ठांनी याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, त्यांना मुख्यालयी ठेऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवाव्या, अशी मागणी आहे.
मांगलादेवीचे आरोग्य उपकेंद्र सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 9:26 PM
नेर तालुक्यातील माणिकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया मांगलादेवी येथील आरोग्य उपकेंद्र सलाईनवर आहे. मांगलादेवीसह लगतच्या मांगुळ, कुºहेगाव, चिखली(कान्होबा) या गावातील नागरिक याठिकाणी उपचारासाठी येतात.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे : ग्रामीण जनतेच्या आरोग्याकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष