लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्यावतीने संपूर्ण राज्यातील ध्यान केंद्रात एकाचवेळी मंत्रोच्चार आणि वृक्षारोपण करून जागतिक विक्रमासाठी नोंद करण्यात आली. या कार्यात शहरातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. येथील बाजोरियानगरात स्वामी समर्थ ध्यान केंद्रात हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चार तास मंत्रोच्चारन केले.प्रार्थना, गणेशध्यान, गणेश गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र, नवार्नव मंत्र, सूर्यमंत्र, सूर्य गायत्री मंत्र, महामृत्यूंजय मंत्र, सरस्वती गायत्री मंत्र, गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र यांचा यामध्ये समावेश होता.ध्यान केंद्राच्या प्रशस्त जागेत विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारन केले. ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. सकाळी ९ ते १ या वेळात हा उपक्रम पार पडला. यानंतर स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात अमृतवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी सेवेकरी सेवेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद वितरणाने उपक्रमाची सांगता झाली.अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि दिल्लीमधील ४०० केंद्रावर हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडला. स्वामी सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे मार्गदर्शक नितीन मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक विकास साधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांकडून स्तोत्र-मंत्र पठणाचा सराव करून घेण्यात आला होता. सोमवारी विद्यार्थी मोठ्या संख्येने येथील स्वामी समर्थ केंद्रात एकत्र आले होते.
विद्यार्थ्यांचा सतत चार तास मंत्रोच्चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:01 PM
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्यावतीने संपूर्ण राज्यातील ध्यान केंद्रात एकाचवेळी मंत्रोच्चार आणि वृक्षारोपण करून जागतिक विक्रमासाठी नोंद करण्यात आली. या कार्यात शहरातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. येथील बाजोरियानगरात स्वामी समर्थ ध्यान केंद्रात हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चार तास मंत्रोच्चारन केले.
ठळक मुद्देजागतिक विक्रमासाठी नोंद : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचा उपक्रम