शहरं
Join us  
Trending Stories
1
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली अॅम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
4
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
5
Team India Arrival LIVE: टीम इंडियाचे 'हार्दिक' स्वागत; रोहितसेनेला पाहण्यासाठी उसळला चाहत्यांचा महासागर
6
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
7
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
8
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांचा घणाघात
9
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
10
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
11
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
12
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
14
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
15
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
16
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
17
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
18
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
19
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
20
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video

यवतमाळात मुख्यमंत्री शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 5:02 PM

मराठा आंदोलनाची झळ यवतमाळातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला

यवतमाळ : येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गालगत किन्ही येथे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडतोय. दरम्यान, कार्यक्रम सुरु असताना बाहेर गोंधळ घातला. यामुळे एकच खळबळ उडाली.

सध्या राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले असून त्याची झळ यवतमाळ येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमालाही बसत आहे. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शासन आपल्या दारी कार्यक्रमस्थळी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण तापले होते. दरम्यान, पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेत, गाडीमध्ये टाकून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं.

मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलच तापलं असून यवतामाळातही यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे सावट पाहायला मिळाले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पोस्टरला अज्ञांताकडून काळे फासण्यात आले. सोमवारी सकाळी आठ वाजता आमदार नामदेव ससाने हे आपल्या खासगी पीएला घेण्यासाठी फुलसावंगी मार्गे यवतमाळकडे जात असताना वरोडी येथेच सकल मराठा समाज बांधवांनी त्यांचा ताफा अडवला. आपणही या कार्यक्रमाला जाऊ नये अशी नागरिकांनी त्यांना विनंती केली नागरिकांचा रोष पाहू आमदार माघारी फिरले. तर, बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. त्यांचे घर आणि गाडी आंदोलकांनी जाळली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील