सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : काश्मिर व तेथील स्थानिकांबद्दल संपूर्ण देशभरात अनेक गैरसमज आहे. मात्र काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले.या संमेलनात नुसताच सहभाग घेण्याऐवजी या युवकांनी काश्मिरी साहित्य मराठीत अनुवाद करून विक्रीला ठेवलयं. त्यांच्या या कामात संजय नहार यांच्या चिनार पब्लिकेशनचा मोठा वाटा आहे. ५० टक्के सवलतीच्या दरात भारताच्या नंदनवनाची माहिती दिली जात आहे. त्यांचा हा स्टॉल खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत ‘अखिल भारतीय’ ठरला. काश्मिरच्या बडगाम येथील फिरदोस अली मीर आणि कुपवाडा येथील मुश्ताक अहेमद हा भारतीय सेतू बांधण्याचे काम करीत आहे. भारतातील इतर राज्यातील नागरिक काश्मिरी व्यक्तीकडे साशंकतेने बघत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.महाराष्ट्रातील मराठी माणूस मात्र काश्मिरींना आपल्यातलाच समजतो, ही ओढच त्यांना या संमेलनात घेऊन आली. फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून काश्मिरबाबत अनेक गैरसमज परसविण्यात येतात. ही दरी मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुश्ताक यांनी सांगितले. महाराष्ट्र हे भारताचे हृदयस्थान आहे. येथे कोणत्याही प्रदेशातील व्यक्तीचा अगदी सहज स्वीकार केला जातो. देशपातळीवरची भूमिका नेहमीच महाराष्ट्रातून ठरली आहे, याचा अभिमान असल्याचेही फिरदोस मीर यांनी सांगितले.पुण्यात मराठीतून पदवीहे दोन्ही युवक मराठीच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी चक्क पुणे येथे कला शाखेला प्रवेश घेतला. ते आता मराठीतून पदवी घेत आहे. दोघेही बीए अंतिम वर्षाला आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात त्यांनी मित्रांचा गोतावळा तयार केला. सुटीच्या दिवसात महाराष्ट्रीयन मित्रांना घेऊन ते काश्मिरमध्ये जातात. तेथील वास्तव दाखवतात. त्यांनी काश्मिरच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकविल्या जाणाºया बाल कथांचाही मराठीत अनुवाद केला. त्याची पुस्तके अगदी सवलतीच्या दरात मराठी माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम हे दोघे करीत आहेत. त्यांचा हा उपक्रम प्रांत व भाषा वादावरून ‘माथी’ भडकवणाºयांसाठी खºया अर्थाने एक मौलिक संदेश आहे.
मराठी साहित्याची काश्मिरी युवकांना भुरळ; संमेलनात हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 9:16 PM
काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले.
ठळक मुद्देमराठी तरुणांना काश्मिरी वास्तविकतेचे दर्शन