शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
4
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
6
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
7
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
8
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
9
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
10
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
11
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
12
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
13
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
14
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
15
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
16
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
17
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
18
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
19
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
20
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...

शारदे, वीणा ठेव दूर आता, शस्त्र घे तू हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 9:31 PM

सारस्वतांना विचार करण्यास भाग पाडणारी ही कविता हुकूमशाहीत सांस्कृतिक चळवळ दडपणाऱ्यांचा निषेध करणारी होती. नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखल्याने प्रवीण दवणे यांनी ही घणाघाती कविता रविवारी सकाळी संमेलनात सादर केली.

ठळक मुद्देमान्यवरांचे कविसंमेलन आंदोलकांचा निषेध करत, सारस्वतांवरही शरसंधान

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :टोपणाने बंद केले लेखणीला,दिन अच्छे आ गये है झाकणालारे खुले आकाश आहेकैद केले अंतरंगाच्या चांदणीलापिंजऱ्याच्या आतच घे भरारीराजहंसी चेहऱ्याची ती गिधाडेगाय ही आपसूकच आली दावणीलालोकशाहीच्या मुळात धुंडतोमी निघालो उत्सवाला शारदेच्यापोहचलो पन लष्कराच्या छावणीलाशारदे ठेव वीणा दूर आता,शस्त्र घे तू हाती, तूच हो दुर्गासारस्वतांना विचार करण्यास भाग पाडणारी ही कविता हुकूमशाहीत सांस्कृतिक चळवळ दडपणाऱ्यांचा निषेध करणारी होती. नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखल्याने प्रवीण दवणे यांनी ही घणाघाती कविता रविवारी सकाळी संमेलनात सादर केली. आंदोलकांना आणि निमंत्रण रद्द करणाऱ्यांचा कवितेमधून खरपूस समाचार घेतला.अजीम नवाज राही यांनी ‘शब्दांची दौलत’ ही कविता सादर केली.शब्दाची दौलत जपतांनाव्यवहार कधी निसटलाहे कळलेच नाही.आता गावाच्या नकाशातघरच नाही.बबन सराडकर यांनी‘चोचीला चारा कुठला, हे कोणी विचारत नाहीगगनाला वैभव भिडले लखलाभ तुमचे तुम्हालाकरपले पीक यंदा ही नुसत्या दिशा उरल्याहंगाम कशाचा करता हे कुनी विचारत नाही ’या कवितेमधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तुकाराम धांडे यांनी ‘राण’ नावाच्या कवितेमध्ये दऱ्या खोऱ्यातील मानवी जीवन व्यक्त केले. अशोक नायगावकर यांनी शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने झालेली उलथापालथ मांडली. मुबारक शेख यांनी ‘जगाचा पोशिंदा पोट मारून जगतो , ढेरपोट्यांना अजीर्ण व्हावे’ ही कविता सादर केली.अरूण म्हात्रे यांनीजसे स्वप्न पडलेतसा चालतो मी,जेथे प्रेम म्हणतेतिथे थांबतो मीया कवितेवर टाळ्या घेतल्या. या कविसंमेलनाचे बहारदार संचालनही अरूण म्हात्रे यांनीच केले.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन