जिल्हा परिषद अध्यक्षांचा अल्टीमेटम : पाणीटंचाई आढावा बैठकीचे सरपंचांना निमंत्रणच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी येथील गटविकास अधिकाºयांना कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा कठोर इशारा दिला. येथील पाणीटंचाई आढावा बैठकीत त्यांनी बीडीओंसह ग्रामसेवकांना धारेवर धरले.येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आणि विकास कामांचा आढवा घेण्यात आला. या बैठकीत पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी यांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाºयांचे ग्रामसचिवांच्या कामावर नियंत्रण नसल्याचा थेट आरोप केला. यावर संतापलेल्या अध्यक्षांनी बीडीओंना कामात तत्काळ सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला. यामुळे काही काळ सभागृहात शांतता पसरली होती. तालुक्यात टाकळी आणि साखरा येथे पाणीटंचाई आहे. तेथील समस्या येत्या ३१ नोव्हेंबरपूर्वी निकालात न निघाल्यास संबंधित ग्रामसेवकांच्या निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही अध्यक्ष माधुरी आडे यांनी बीडीओंना दिले. यावषी अल्प पावसामुळे भूजल पातळी खालावल्याने ती वाढविण्यासाठी प्रत्येक हातपंपाजवळ शोषखड्डे तयार करण्याचे निर्देेश अध्यक्ष आडे यांनी ग्रामसेवकांना दिले. दरम्यान या सभेला तालुक्यातील सरपंचांना न बोलविल्याच्या निषेधार्थ उपाध्यक्षांनी सभेच्या सुरुवातीलाच सभात्याग केला.सर्व ३६ ग्रामसेवक हजरपांढरकवडा येथील आढावा बैठकीला दांडी मारणाºया दोन विस्तार अधिकाºयांना निलंबित करण्याचे, तसेच पाणीटंचाई असूनही पाणीटंचाई नसल्याचा अहवाल देणाºया ग्रामसेवकांवर थेट फौजदारी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यामुळे या बैठकीला तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक उपस्थित होते.
मारेगाव बीडीओ, ग्रामसेवकांना धारेवर धरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:00 AM
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी येथील गटविकास अधिकाºयांना कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा कठोर इशारा दिला.
ठळक मुद्देमारेगाव बीडीओ, ग्रामसेवकांना धारेवर धरले