शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 AM

बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे.

ठळक मुद्देनिकालाने रेकॉर्ड मोडले : वणी ८२.०१, मारेगाव ७९.६६, झरी ९२.०३, पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९०

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला़ यावर्षी तोंडी परीक्षेचे गुण पुन्हा बहाल केल्याने निकालावर पुन्हा सूज आल्याचे दिसून येत आहे. जवळपास बहुतांश शाळांचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. वणी उपविभागातून मारेगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे, तर पांढरकवडा तालुक्याने झरी उपविभागात बाजी मारली आहे.बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे. सर्वच तालुक्यांचा निकाल मागील वर्षीपेक्षा वाढला आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये वाढ झाली आहे. अनेक विज्ञान शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सर्वच पेपर संपल्यानंतर राज्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे पेपर तपासणीसाठी अडथळे निर्माण झाले होते. परिणामी निकाल दोन महिने उशिरा लागला. वणी तालुक्याचा बारावीचा निकाल ८२.०१ टक्के लागला. तालुक्यातून दोन हजार ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी एक हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात वणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची सुवर्णा किसनराव हनुमंते हिने मिळविला असून तिला ९०.४६ टक्के गुण मिळाले आहेत.मारेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ७९.६६ टक्के लागला आहे़ तालुक्यातून ९४४ विद्यार्थी बसले. त्यांपैकी ७५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून मारेगाव येथील कला-वाणिज्य महाविद्यालयातील वैशाली संजय सिडाम ही विद्यार्थीनी तालुक्यातून प्रथम आली. तिला ८४.१५ टक्के गुण मिळाले आहेत. झरीजामणी तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.०३ टक्के लागला आहे़ ६५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांपैकी ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुकूटबन येथील मातोश्री पुनकाबाई विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील राज अनिल पारखी हा झरी तालुक्यातून प्रथम आला असून त्याने ८५.०७ टक्के गुण मिळविले. पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९० टक्के लागला़ एक हजार ७०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपैकी एक हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून जिल्हा परिषद माजी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचा तुषार शरद काळे हा ८६ टक्के गुण घेऊन प्रथम आला.१० शाळांचा निकाल लागला १०० टक्केउपविभागातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणीतील हाजी शिराजुद्दीन कॉलेज राजूर व लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी, झरीमधून शासकीय ज्युनिअर कॉलेज शिबला, राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण, पांढरकवडामधून सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय वाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्युनिअर कॉलेज भाडउमरी व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय पांढरकवडाची विज्ञान शाखा, मारेगावातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी विज्ञान शाखा व जीवन विकास विद्यालय मारेगाव, या महाविद्यालयांचा समावेश आहे.प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणारयावर्षी बारावीचा विज्ञान, कला व वाणिज्य तिनही शाखांचा निकाल रेकॉर्डब्रेक लागल्याने चारही तालुक्यात प्रथम वर्षाच्या उपलब्ध जागा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणार असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे अधिक कल असतो. परंतु बीएससी प्रथम वर्षाचे चारही तालुक्यात मोजकेच वर्ग असल्याने अनेक विद्यार्थ्यांना बीएससीला प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता लागली आहे. हीच परिस्थिती कला व वाणिज्य शाखेमध्येही होणार आहे. शासनाला प्रथम वर्षाच्या अधिक जागा निर्माण करून द्याव्या लागणार आहेत.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल