लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत आठवड्याला भाजी विक्रेत्यांची ३०० टन भाजी विक्रीविनाच राहिली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे भाजीमंडी विक्रेता संघटनेने रविवारी शेतमालाचा हर्रास न करण्याचा निर्णय घेतला. यातून १२ हजार ग्राहकांची साखळी तुटली. शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसावे लागले.कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने २९ मार्चला भाजीमंडीत नाकाबंदी केली. परिणामी ३०० टन भाजी विक्रीविना सडली.अशा स्वरूपाचे नुकसान पुन्हा होऊ नये म्हणून भाजीमंडी विक्रेत्यांनी रविवारी भाजीविक्रीच न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ एप्रिलला या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेक शेतकºयांना याची कल्पणा नव्हती. त्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी मंडीत आणला. विक्री न झाल्याने रस्त्याच्या कडेला तो विकला. या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. यामुळे पोलिसांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.भाजी विक्री सुरळीत पार पाडावी याकरिता प्रत्येक प्रभागात विक्रेत्यांचे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी नियोजित प्रभागात जाण्यासाठी विक्रेते तयार नाही. ज्या भागात सर्वाधिक भाजी विकली जाते, अशा ठिकाणी घोळका केला जातो. यामुळे पोलीस प्रशासनानेही अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात विक्रेतेही प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.अपुरे व्यापारी आणि जादा भाजीपाला४८० व्यापाऱ्यांनी भाजी विक्रेते म्हणून नोंद केली. त्यातील अनेक विक्रेते डमी आहे. गत आठ दिवसात यातील मोजकेच विक्रेते भाजी खरेदीसाठी आले आहे. यामुळे इतर विक्रेते गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादित भाजी आणायची तर इतर प्लॉटमधील भाजीचे करायचे काय, असा पेच भाजीपाला उत्पादकांना सतावत आहे.ठोक आणि चिल्लर दरातील तफावत वाढलीभाजीपाला खरेदी करणारे व्यापारी मोजकेच आहेत. भाजीची मागणी जास्त आहेत. यामुळे मोजकेच विक्रेते तुटवडा भासवत जादा दरात भाजीची विक्री करीत आहे. मुळात शेतकºयांकडून कमी दरातच भाजीची खरेदी झाली आहे.मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना भाजीची परवानगी दिली तर हा गोंधळ संपेल. भाजी विक्रीची परवानगी देताना भाजीमंडी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तर हा विक्रेता आहे की नाही, असा प्रश्नही राहणार नाही.- गजानन बरे,अध्यक्ष, भाजी विक्रेता संघटना
मंडई बंदने शेतकऱ्यांनी फेकली रस्त्यावर भाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM
कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे.
ठळक मुद्देलिंक तोडली : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रविवारचा भाजी हर्रास थांबला