लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मार्च अखेरच्या हिशेबासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्रीचा पेच निर्माण झाला आहे.मार्च महिन्यात पूर्ण वर्षभराचा हिशेब जुळविला जातो. त्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील धान्य खरेदी थांबविण्यात आली आहे. पुढील आठ दिवस बाजार समित्या बंद राहणार आहे. आता एप्रिल महिन्यातच बाजार समित्यांचे व्यवहार सुरू होणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या स्थितीचा लाभ घेत व्यापारी खुल्या बाजारात शेतमालाचे दर पाडत आहे. यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहे. वर्षभर खरेदी केलेल्या शेतमालाच्या हिशेबाची जुळवाजुळव करण्यात सध्या सर्व व्यस्त आहे. बँकांचाही हिशेब सुरू आहे. यामुळे व्यापाऱ्यांना बँकेतून उपलब्ध होणारे पैसे मिळेनासे झाले. त्यामुळे बाजार समितीमधील शेतमाल खरेदीवर परिणाम झाला. परिणामी बाजार समितीमधील खरेदीदार व्यापारी मार्च अखेरीस व्यापार थांबवितात. यावर्षी ही खरेदी आठ दिवसांकरिता बंद ठेवण्यात आली आहे.गुढीपाडव्यानंतरच खरेदीचा शुभारंभआर्थिक व्यवहारातील देवाण-घेवाण संपल्यानंतर एप्रिलमध्ये शेतमालाची खरेदी सुरू होईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा खरेदी होणार आहे. पहिल्याच आठवड्यात गुढीपाडवा आहे. यामुळे शेतकºयांसाठी महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्यावरही आर्थिक तंगीचे सावट राहण्याची शक्यता आहे.
बाजार समित्या आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 9:38 PM
मार्च अखेरच्या हिशेबासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्रीचा पेच निर्माण झाला आहे. मार्च महिन्यात पूर्ण वर्षभराचा हिशेब जुळविला जातो.
ठळक मुद्देमार्च एन्डिंग : शेतमाल विक्रीसाठी अडचण