शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM

हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली.

ठळक मुद्देऐनवेळी परतविली गर्दी : कोरोनाच्या धास्तीने जागरुक कार्यकर्त्यांनी टाळला कळंब तालुक्यातील पेचप्रसंग

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिरवा मांडव पडला. त्या पलिकडे मोठा शामियानाही सजला. नवरी नटून तयार होती. नवरदेव चार ट्रॅक्स आणि एक मोठे वाहन भरुन लग्नवऱ्हाडी घेऊन पोहोचला. किमान ११०० ते १२०० जणांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार होता. मात्र ऐनवेळी धडकलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती करून सर्वांचे मन वळविले आणि वऱ्हाड्यांना आपआपल्या गावाकडे परत पाठविले. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वऱ्हाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांनी संकल्प फाऊंडेशनचे यवतमाळातील पूर्वज गलांडे, आकाश भारती, तुषार गिरी व काही कार्यकर्ते सोबत घेतले आणि तडक किन्हाळा (ता.कळंब) गाव गाठले. गावाबाहेरच वऱ्हाड्यांना रोखून सर्वांना कोरोना जनजागृतीबाबत पॉम्पलेट वाटप केले. डीजे परत पाठविण्यात आला. यावेळी अनेकांनी विरोधही केला. मात्र पवार यांनी गावातील सरपंच सुदाम पवार यांच्याशी चर्चा करून सर्व वऱ्हाड्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. अखेर सर्वांनी समंजसपणा दाखवित लग्नातील गर्दी टाळली. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांचे शुभमंगल पार पाडण्यात आले.सध्या दिल्लीत झालेल्या मरकस कार्यक्रमातील हजारोंची उपस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. किन्हाळात हजार-बाराशे मंडळींच्या हजेरीत हा लग्न सोहळा झाला असता तर जिल्ह्यात मरकस सारखीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका होता.आशा सेविकेचे प्रसंगावधान ठरले उपयुक्तअत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या गावखेड्यातील आशा सेविका कोरोनाच्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किन्हाळात होऊ घातलेल्या लग्नातील गर्दीचा धोकाही सर्वप्रथम आशा सेविकेने ओळखला. मात्र प्रसंगावधान राखून तिने आपल्या वरिष्ठांना माहिती कळवून ही गर्दी रोखली. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढला असता. विशेष म्हणजे हजार वºहाडी गावातून परत पाठविताना प्रत्येकाला कोरोनाची माहिती देणारे पॉम्पलेट देण्यात आले. प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न