विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : माय-बापाचा पत्ता नाही, पण आनंद बालसदन हेच मायेचे छप्पर असलेल्या सोनुचा शनिवारी येथे थाटात विवाह पार पडला. रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे साक्षीदार म्हणून शहरातील अनेक मान्यवर व शहरवासी हे होते.१४ वर्षापूर्वी कोणीतरी सोनुला येथील अनाथांच्या आनंद बालसदनमध्ये दाखल केले. तेव्हापासून बालसदनच परीवार हाच तिचाही परीवार बनला. येथील बालसदनचे अध्यक्ष किशोर मोघे यांनी इतर अनाथ बालकांसोबतच सोनुलाही शिक्षणाचा मार्ग दाखविला. आठ वर्षे तिने शिक्षण घेतल्यानंतर ती एक वर्षापूर्वी येथील एका टायपिंग संस्थेत प्रवेश घेण्यासाठी गेली. तेथेचे संस्थेचे संचालक सुरेश देशकर व कीर्ती देशकर यांची ओळख झाली आणि तेव्हापासूनच देशकर दाम्पत्यांनी तिला मानसकन्या म्हणून तिच्या आयुष्याचा उद्धार करण्याचे ठरविले. तिच्या विवाहाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली. यवतमाळ येथील ब्राम्हण समाजातील एका कुटुंबाशी त्यांचे जिल्ह्याचे संबंध होते. त्या कुटुंबातील अतुल नावाचा तरूण मोबाईल शॉपीमध्ये काम करीत होता. त्यानेही एखाद्या अनाथ मुलीशीच विवाह करण्याचा संकल्प केला होता. ही बाब देशकर दांपत्यांनी हेरून सोनुच्या लग्नाची त्यांचीशी बोलनी केली. त्यात त्यांना यशही आले. वर्धमान इंटरनॅशनल ग्रूपने लग्न मंडप व भोजनाची मदत जाहीर केली. २७ जानेवारीला वाजतगाजत वरात लग्नमंडपात पोहोचली. लग्न सोहळ्याला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संजय देरकर, सुनील कातकडे, विजय चोरडीया यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. देशकर दाम्पत्यांनी कन्यादान केले. यासाठी आनंद बालसदनचे मिलींद आमटे, प्रविण आत्राम, निलेश गाडगे यांनी सहकार्य केले.साश्रू नयनांनी वऱ्हाडी गहिवरलेसोनुच्या निरोपाचा क्षण तर वऱ्हाड्यांना हेलावून गेला. सोनुची बिदायगी करताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. सोनुलाही आनंद बालसदनचा परिवार सोडून जाताना दु:ख अनावर झाले होते. बालसदनचे कर्मचारी, तिचे सर्व सवंगडी यांच्या दु:खाला पारावार उरला नव्हता. अध्यक्ष किशोर मोघे, सुरेश देशकर, कीर्ती देशकर यांना तर पोटच्या मुलीला सासरच्या स्वाधीन करताना जेवढे दु:ख नव्हते, त्यापेक्षाही अधिक दु:ख होत होते.
अनाथ सोनूचा वणीत थाटात विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 9:55 PM
माय-बापाचा पत्ता नाही, पण आनंद बालसदन हेच मायेचे छप्पर असलेल्या सोनुचा शनिवारी येथे थाटात विवाह पार पडला. रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे साक्षीदार म्हणून शहरातील अनेक मान्यवर व शहरवासी हे होते.
ठळक मुद्दे देशकर परिवारांनी केले कन्यादान : हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत सोनू-अतुलचे सात फेरे