शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या; यवतमाळमधील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:29 AM

मारेगाव येथील कॉन्व्हेंटला शिक्षिका म्हणून काम करणार्या विवाहितेने दीड वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.

यवतमाळ:  मारेगाव येथील कॉन्व्हेंटला शिक्षिका म्हणून काम करणार्या विवाहितेने दीड वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मृतक दि १९ मार्च रोजी रात्री जेवण आटोपल्यावर घरची मंडळी झोपली असताना बेपत्ता झाली होती. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घराशेजारी असलेल्या विहिरीत मायलेकी मृत अवस्थेत आढळून आल्या.      कोमल उमेश उलमाले (वय ३५)  व श्रुती वय (दीड वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. येथील विश्रामगृह परिसरात त्यांचे वास्तव्य होते. १९ मार्च चे रात्री ८ वाजताच्या दरम्यान पती उमेश दोन मुली,सासू सासरे यांनी एकत्र जेवण केले. थोड्या वेळाने  कुटुंबातील सर्व मंडळी आपआपल्या खोलीत झोपी गेल्यानंतर कोमलने दीड वर्षाच्या श्रृती नामक लहान मुलीसह मागच्या दारातून घर सोडले.                  घरुन जाताना कोमलने लहान मुलीला दुध पाजण्यासाठी दुधाची बॉटल सोबत घेतली. ११ वाजताच्या दरम्यान, पत्नी व लहान मुलगी घरी नसल्याचे पतीला लक्षात आले.याची माहिती कुटूंबियांसह शेजा-यांना व नातेवाइकांना देण्यात आली. सगळ्यानी रात्री शोध घेतला परंतु कोमल कुठेही आढळून आली नाही.            शनिवारी २० मार्च रोजी सकाळी साडे सात वाजता कोमलचे पती उमेश उत्तम उलमाले  यांनी पत्नी हरविल्याची तक्रार पोलिसात केली. शोधाशोध सुरू असताना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान, घराशेजारील निलेश थेरे यांच्या शेतातील विहिरीत दुधाची बॉटल व चपला पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली.पाण्यात गळ टाकुन शोध घेतला असता कोमल व श्रुती एकमेकीला कवटाळून  मृत अवस्थेत आढळून आल्या. पुढील तपास ठानेदार जगदीश मंडलवार करीत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळDeathमृत्यू