लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारपर्यंत कोरोना बाधित तीन रुग्ण उपचार घेत होते. मेडिकल प्रशासनाकडे गरजेपुरते मास्क उपलब्ध असल्याने इतर वार्डामध्ये काम करणाऱ्या आंतरवासिता डॉक्टरांना मास्क पुरविले जात नाही. रुग्णालयाबाहेर फिरणाऱ्यांसाठीसुद्धा मास्क उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गातून फैलाव होतो. याचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरावा असे सर्रासपणे सांगितले जात आहे. यातही दोन मतप्रवाह आहे. अनेक तज्ज्ञ सामान्य व्यक्तींनी मास्क वापरु नये असे सांगतात केवळ ठराविक अंतर ठेऊन संभाषण करावे तर रुग्णांच्या संपर्कात येणाºया व्यक्तीने कोरोना कीटचा वापर करावा, सतत गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्यांनी मास्क वापरावा असे सांगितले जाते. शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या वार्डमध्ये काम करणाºया डॉक्टर व नर्सला कोरोना कीट पुरविण्यात आली आहे. यामध्ये कॅप, मास्क, गॉगल, पूर्ण अॅप्रन, ग्लोज याचा समावेश आहे. ही कीट फक्त रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाच दिली जाते. या व्यतिरिक्त मेडिकलमधील बाह्य रुग्ण तपासणी विभाग, अपघात कक्ष येथील डॉक्टर व इतर स्टाफला मास्क देण्यात आले आहे. उर्वरित वार्ड व इतर ठिकाणी काम करणाऱ्यांना मास्कची गरज नसल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही आंतरवासिता विद्यार्थी स्वत:ला असुरक्षित समजत असून त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे मास्कची मागणी केली आहे. सध्या एक हजार थ्रीलेअर साधे मास्क रुग्णालयात आले आहे तर १५०० मास्क मुंबईवरून निघाले असून दोन दिवसात मेडिकलमध्ये येतील असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मेडिकलमध्ये गरजेपुरते मास्क उपलब्ध आहे. अवांतर व्यक्तींसाठी मास्क पुरविणे सध्या शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.गर्दी ओसरलीकोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह््यात उद्रेक झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. पूर्वी किमान दोन हजार रुग्ण बाह्य तपासणी विभागात येत होते. आता हा आकडा ७०० च्या घरात पोहोचला आहे.
‘मेडिकल’मध्ये मास्कचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:09 PM
कोरोना विषाणू संसर्गातून फैलाव होतो. याचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरावा असे सर्रासपणे सांगितले जात आहे. यातही दोन मतप्रवाह आहे. अनेक तज्ज्ञ सामान्य व्यक्तींनी मास्क वापरु नये असे सांगतात केवळ ठराविक अंतर ठेऊन संभाषण करावे तर रुग्णांच्या संपर्कात येणाºया व्यक्तीने कोरोना कीटचा वापर करावा, सतत गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्यांनी मास्क वापरावा असे सांगितले जाते.
ठळक मुद्देआंतरवासिता डॉक्टर असुरक्षित । ओपीडी, आयसोलेशन वार्ड व अपघात कक्षातच पुरवठा