शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

मास्टरमाईंड परस्पर करतोय जिल्हा बँक खातेदारांना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 5:00 AM

आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाने महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित केले आहे. यातीलच एक या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड ओळखला जातो. बँकेच्या तिजोरीतील लाखो रुपयांची रोकड व्यापाऱ्यांना दोन टक्के व्याज दराने देणे, खातेदारांच्या अकाऊंटमधून परस्पर लाखो रुपयांची रक्कम काढून घेणे असे प्रकार घडले आहेत. एवढा मोठा कारनामा करूनही त्याच्या विरोधात पोलिसात अद्याप तक्रार दाखल न झाल्याने तो मोकळाच आहे.

ठळक मुद्देआर्णी शाखेतील गैरव्यवहार : अद्याप हातकड्या न लागल्याचा उठवितोय फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड अद्याप हातकड्या न लागल्याने मोकळाच आहे. त्यामुळे त्याने स्वत:च खातेदारांना परस्पर फोन करून ‘बँकेत जाऊ नका, तक्रार देऊ नका, मी बाहेरच तुमच्या गेेलेल्या पैशाची व्यवस्था करून देतो’ अशी गळ घालणे सुरू केले आहे. आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाने महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित केले आहे. यातीलच एक या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड ओळखला जातो. बँकेच्या तिजोरीतील लाखो रुपयांची रोकड व्यापाऱ्यांना दोन टक्के व्याज दराने देणे, खातेदारांच्या अकाऊंटमधून परस्पर लाखो रुपयांची रक्कम काढून घेणे असे प्रकार घडले आहेत. एवढा मोठा कारनामा करूनही त्याच्या विरोधात पोलिसात अद्याप तक्रार दाखल न झाल्याने तो मोकळाच आहे. त्यामुळे त्याने बँकेत खातेदारांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातूनच काहींना त्याने संपर्क केला व तक्रार करू नका, मी तुमचे पैसे देतो, असे सांगितले. मात्र खातेदार त्याची ही विनवणी धुडकावून थेट बँकेत खात्यातील रक्कम तपासणीसाठी जात आहेत व रक्कम कमी आढळल्यास व्यवस्थापकाकडे रीतसर तक्रार नोंदवित आहेत. मास्टरमाईंड स्वत:हून फोन करीत असल्याने आर्णी शाखेत नेमक्या कुणाकुणाच्या खात्यातून किती रक्कम गहाळ केली, याची इत्थंभूत माहिती त्याला असावी असे स्पष्ट होते. त्या आधारेच तो संबंधित खातेदारांना संपर्क करीत आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष एफआयआर होण्यास आणखी किती वेळ लागतो याकडे लक्ष आहे. पैसे भरून मिळतील या आशेपोटी खातेदार अद्याप पोलीस ठाण्याची पायरी चढलेले नाहीत. एवढा घोटाळा करूनही मास्टरमाईंड मोकळा कसा, याची चर्चाही होताना दिसते. आर्णी शाखेतील या घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी  आहे.  पण आकडा कमी दाखविण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत   आहे. त्रयस्थ सीएच्या लेखापरीक्षणात गैरव्यवहाराचा नेमका आकडा व फटका बसलेल्या खातेदारांची संख्या, नावे उघड होणे अपेक्षित आहे. मात्र या गैरव्यवहाराचे लाभार्थी केवळ बँकेतच की बँकेच्या बाहेरही याबाबत तर्क लावले जात आहेत. निलंबितांपैकी गैरव्यवहारात कुणाचा नेमका दोष किती हे यथावकाश स्पष्ट होईलच. मात्र या गैरव्यवहाराचे ‘वाटेकरी’ जुन्या संचालकांपैकी तर कुणी नाही ना, अशी शंकाही खातेदारांमधून व्यक्त होत आहे. एवढा मोठा गैरव्यवहार करणाऱ्या या मास्टरमाईंडला संचालक मंडळातील नेमके कुणाचे पाठबळ असावे, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहे. दरम्यान, गैरव्यवहार उघडकीस आल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी बँकेत रकमेची तपासणी करणाऱ्यांची गर्दी आणखी वाढली. बँकेचे एक संचालक राजूदास जाधव यांनी दुपारी बँकेला भेट दिली. तर एक लाखांचा धनादेश दिला असताना खात्यातून सात लाख रुपये काढले गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाने थेट बँकेच्या अध्यक्षांना फोन करून आर्णी शाखेत भेट देण्याची विनंती केली. 

  वृद्धेच्या खात्यातील ३५ हजार उडविले आर्णीतील ग्रीन पार्क येथे राहणाऱ्या अनुसया शंकर वानखेडे (३५) या वृद्धेने २ जुलै २०१९ ला आर्णी शाखेत ५० हजार रुपये जमा केले. त्यापैकी एकदा पाच हजार व एकदा दहा हजार त्यांनी काढले. मात्र त्यानंतर त्यांच्या खात्यातील ३५ हजार रुपये परस्परच गहाळ झाले. सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एका माजी संचालकाची भेट घेऊन याची माहिती दिली. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही तर बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अनुसया यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सांगितले. गंभीर प्रकार उघड होऊनही दखल न घेणाऱ्या त्या माजी संचालकाचा ‘इन्टरेस्ट’ काय, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे.  

गहाळ रक्कम पोहोचली एक कोटी सात लाखांवर बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण ५२ खातेदारांनी आपल्या खात्यातून परस्पर रक्कम गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या. ही रक्कम एक कोटी सात लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. तपासणी व दक्षता पथक नेमके करते तरी काय ?अकस्मात भेटी देऊन तपासणी करणे, व्यवहारांवर वाॅच ठेवणे यासाठी जिल्हा बॅंकेत उपसरव्यवस्थापकांच्या नेतृत्वात तपासणी आणि दक्षता ही दोन स्वतंत्र पथके आहेत. ही पथके कार्यरत असताना आर्णी शाखेत एवढा मोठा आर्थिक घोळ कसा असा मुद्दा उपस्थित होत आहे. या गैरव्यवहाराने तपासणी व दक्षता पथकातील   अधिनस्त यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. या पथकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दोन आठवड्यांपूर्वीच घेतली खासदारांची भेट आर्णी शाखेतील गैरव्यवहाराची जिल्हा बँकेच्या यवतमाळ मुख्यालयाला कुणकूण लागल्यानंतर संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीने तीन निलंबितांपैकी दोघांनी दोन आठवड्यांपूर्वी आर्णीच्या शासकीय विश्रामगृहावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांची भेट घेतली. आर्णीतील काँग्रेसच्या  दोन पदाधिकाऱ्यांनी या भेटीसाठी मध्यस्थी केली. मात्र   झालेली निलंबन कारवाई बघता त्यांची भेट व्यर्थ ठरल्याचे दिसते. मध्यस्थाची भूमिका वठविणाऱ्यांची या गैरव्यवहारातील ‘मास्टरमाईंड’शी जवळीक तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी