शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जलसंपदा विभागाच्या कारभारावर ‘मॅट’चे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 12:52 PM

जलसंपदा विभागाच्या कारभारावर मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील चार प्रतिवादींना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

ठळक मुद्देचार प्रतिवादींना दहा हजारांचा दंड विधवेचा अनुकंपा अर्ज केला गहाळपत्रव्यवहाराला दहा वर्षे प्रतिसादही नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ज गहाळ करणे, येरझारा मारायला लावणे, दहा वर्षे पत्रव्यवहाराला प्रतिसाद न देणे, अनुकंपा नोकरी मागणाऱ्या आईच नव्हे तर मुलालाही वारंवार त्रास देणे या जलसंपदा विभागाच्या कारभारावर मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील चार प्रतिवादींना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.दीपक भिकाजी कांबळे (धरणग्रस्त वसाहत, ता. करवीर जि. कोल्हापूर) यांच्याप्रकरणात २९ जानेवारी रोजी ‘मॅट’ने निर्णय दिला. दीपकचे नाव अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ठ करावे, त्याचा १२ डिसेंबर २००६ चा मूळ अर्ज मान्य करुन प्रतीक्षा यादीत तेव्हाची ज्येष्ठता द्यावी, त्यानंतरच्यांना नोकरी दिली असेल तर दीपकलाही प्राधान्याने शासकीय नोकरीत नेमणूक द्यावी, दोन महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले.दीपक कांबळे यांनी अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये हे प्रकरण दाखल केले होते. त्यात दुधगंगा कॅनॉल विभाग क्र. १० चे उपकार्यकारी अभियंता, कोल्हापूरचे जलसंपदा अधीक्षक अभियंता, जलसंपदा खात्याचे सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे सचिव या चौघांना प्रतिवादी बनविण्यात आले होते. या प्रतिवादींवर दंड बसवित ‘मॅट’ने त्यांना दणका दिला. शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.

नोकरीसाठी विधवेचा दहा वर्षे संघर्षप्रकरण असे, जलसंपदा विभागात वर्ग-४ चे कर्मचारी असलेल्या दीपक यांच्या वडिलांचे ३ जुलै १९९६ ला निधन झाले. त्यावेळी दीपक अज्ञान होते. म्हणून दीपकची आई शालन यांनी १४ मार्च १९९७ ला अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. वारंवार प्रत्यक्ष भेट घेऊन व स्मरणपत्रे देऊनही दहा वर्ष (२००६ पर्यंत) त्यांच्या पत्रांना जलसंपदा खात्याने कोणताही प्रतिसाद अथवा उत्तर दिले नाही. १२ डिसेंबर २००६ ला त्यांनी अखेरचे स्मरणपत्र दिले होते. सोबतच मी वयात बसत नसेल तर माझ्या मुलाला (दीपक) अनुकंपा नोकरी द्या, अशी विनंती केली होती.

कार्यालय स्थानांतरणात अर्ज गहाळमुलगा दीपक सज्ञान झाल्यानंतर त्यांनी ११ जानेवारी २००७ ला अर्ज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मंत्रालयस्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला. तेव्हा जलसंपदा कार्यालयाच्या स्थलांतरणात शालन कांबळे यांचा अर्ज गहाळ झाल्याचे मंत्रालयातून कळविले गेले. या प्रकरणात जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने एकमेकांकडे बोट दाखविले. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले गेले.

निर्णय घेण्याचे आदेश थेट मंत्रालयातूनमंत्रालयातून किमान दीपकच्या अर्जावर निर्णय घ्या असे निर्देश दिले गेले. तेव्हा दीपकच्या अर्जाला विलंब झाला, २००३ ला तो सज्ञान झाला असताना तीन वर्ष तीन महिने विलंबाने अर्थात २००७ ला अर्ज केला. नियमानुसार दोन वर्षापेक्षा अधिक विलंब काळ माफ करता येत नाही, असे जलसंपदा विभागाने सांगत दीपकचा अर्ज फेटाळून लावला.कमिटीपुढे प्रकरणच ठेवले गेले नाहीअशा माफीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या स्तरावर कमिटी असते. त्यांच्या तीन बैठका झाल्या, मात्र त्यात दीपकचे प्रकरण ठेवले गेले नाही. २०१६ ला हे प्रकरण ठेवले असता या कमिटीने विलंबाच्या कारणावरून फेटाळले. अनेक प्रकरणांमध्ये पाच ते सात वर्ष विलंबानंतरही प्रकरणे मंजूर केली असताना दीपकलाच वेगळा न्याय का असा मुद्दा अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांनी उपस्थित केला.

गोंधळाला जलसंपदा विभाग जबाबदारया गोंधळाला जलसंपदा विभाग जबाबदार आहे. दीपकच्या आईला वेळीच नियुक्ती मिळाली असती तर आज त्यांच्यावर न्यायालयात येण्याची वेळ आली नसती, याकडे ‘मॅट’चे लक्ष वेधले गेले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांचा हवालाही देण्यात आला. मात्र अनुकंपा नोकरी देणे हा कायदेशीर हक्क नाही असा आक्षेप सरकारी पक्षातर्फे क्रांती गायकवाड यांनी नोंदविला. मात्र तो फेटाळून लावत ‘मॅट’ने दीपकला दिलासा दिला. अर्जाला झालेला विलंब माफ करता येत नाही हा २२ जून २०१७ चा आदेश रद्द करण्यात आला. जलसंपदा विभागाचा निष्काळजीपणाच या गोंधळाला जबाबदार असून त्यामुळेच दीपकला न्यायालयात धाव घ्यावी लागली असा ठपका न्यायालयाने ठेवला.

निष्काळजीपणा माफ करण्यासारखा नाहीजलसंपदा विभागाचा निष्काळजीपणा गंभीर आहे, तो माफ करण्यासारखा नाही, सरकारच्या धोरणाला छेद देणारा आहे, तांत्रिक मुद्दे विनाकारण उपस्थित करून जबाबदारी टाळणारा आहे, अशा शब्दात ‘मॅट’ने कोल्हापूर जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय