जवळा : आर्णी तालुक्यातील किन्ही गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या चांदापूर येथे नित्यनेमाने मनोरुग्ण व बेवारस असलेल्या गरजूंना भोजन दिले जात आहे.
गेल्या एक महिन्यापासून काेणत्याही कार्यक्रमाला केवळ ५० लोकांची परवानगी आहे. त्यामुळे लग्न साेहळे कमी गर्दीत होत आहे. काही दिवसापूर्वी शक्तिमान रमेश जाधव व सरोज अनिल राठोड यांचा विवाह झाला. त्यांनी मनोरुग्ण व भुकेलेल्यांना भोजन दान दिले. त्यांनी तब्बल २०० डब्यांची व्यवस्था करून दिली. या कार्यासाठी चांदापूरवासियांनी मोलाचे सहकार्य केले. नववधू आणि वर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चांदापूर येथील विशाल जाधव व टीम अन्नदात्याने आभार मानले. या सेवा कार्यात सुजाता व विशाल जाधव अविरतपणे सहभागी आहे. त्यांना संदीप शिंदे, झाकीर हुसेन, खुशाल जाधव, स्वप्नील चव्हाण, सावन राठोड, रोहन राठोड, अर्जुन जाधव, मनोज राठोड, निखिल राठोड, अभिषेक राठोड, गजानन इंगळे, संतोष इंगळे, रवी राठोड, रोहित पवार, संतोष राठोड, भूषण चव्हाण, संजय राठोड, अजित राठोड, अमित राठोड, आकाश राठोड यांच्यासह गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.