शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘मेडिकल’ला अखेर चार व्हेन्टीलेटर मिळणार

By admin | Published: September 20, 2015 12:07 AM

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेन्टीलेटरअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत होते. याबाबत सर्व सामान्यांकडून सातत्याने ओरड सुरू होती.

रुग्णांना दिलासा : सोनालीचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला सूचले शहाणपण यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेन्टीलेटरअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत होते. याबाबत सर्व सामान्यांकडून सातत्याने ओरड सुरू होती. मात्र प्रशासनाने याची दखलच घेतली नाही. ‘लोकमत’ने हा मुद्दा उचलल्यानंतर जनभावना उफाळून आली. त्यानंतर तातडीने चार व्हेन्टीलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर, पुणे व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेन्टीलेटर मागविण्यात आले आहे. यवतमाळ रुग्णालयात सर्वाधिक विष प्राशन आणि सर्पदंशाचे रुग्ण येतात. यातील रुग्णांना जीवन रक्षक प्रणाली असलेल्या व्हेन्टीलेटरची नितांत गरज भासते. रुग्णालयात सध्या सात व्हेन्टीलेटर असून त्यापैकी तीन बंद आहे. त्यामुळे चार व्हेन्टीलेटरवरच ताण वाढला, अशा स्थितीत कोणता रुग्ण व्हेन्टीलेटरवर ठेवायचा आणि कुणाला काढायचे हा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण व्हायचा. एकाला वाचविण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणे असाच प्रकार करण्याची वेळ येथील डॉक्टरांवर आली होती. मात्र त्या उपरही प्रशासनाकडून या गंभीर समस्येबाबत ठोस उपाययोजना केली जात नव्हती. त्यातच बाळंतिणीचा मृत्यू झाला. नंतर चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणीचाही मृत्यू झाला. यावरून लोहारा येथील ग्रामस्थांनी थेट अधिष्ठाताला घेराव घालून रोष व्यक्त केला. त्यानंतर निर्ढावलेले प्रशासन ताळ्यावर आले. किमान तात्पुरती व्यवस्था म्हणून तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून प्रत्येकी एक व्हेन्टीलेटर काही दिवसांसाठी मागिवण्यात आले. याच प्रमाणे पुणे व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून व्हेन्टीलेटर मागविण्यात आले आहे. चार पैकी एक व्हेन्टीलेटर सायंकाळपर्यंत रुग्णालयाला प्राप्त होईल, अशी माहिती अधीक्षक रोहिदास चव्हाण यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)