लोकमत न्यूज नेटवर्क बाभूळगाव : राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा अत्यंत फसवी असल्याचा आरोप करीत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीतर्फे १४ जुलै रोजी १०० शेतकऱ्यांची शवयात्रा हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या प्रचाराकरिता शुक्रवारी बाभूळगाव येथे सभा पार पडली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ही प्रचारसभा पार पडली. यावेळी माजी आमदार विजया धोटे, प्रफुल्ल मानकर, मनीष पाटील, देवानंद पवार, राजेंद्र हेंडवे, मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा, किरण कुमरे, यशवंत इंगोले, योगेश धानोरकर आदी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शवयात्रा आंदोलनाची माहिती जिल्हाभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीतर्फे तालुका दौरे सुरू करण्यात आले आहे. तसेच यवतमाळात ‘वॉर रूम’ निर्माण करून आंदोलनाच्या पूर्वनियोजनाचा आढावा घेतला जात आहे. बाभूळगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केले. आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी यावेळी बाभूळगाव तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यात भैयासाहेब देशमुख, अशोकराव घारफळकर, डॉ. रमेश महानुर, राजाभाऊ हेंडवे, अतुल राऊत, नायकवाड महाराज, अतुल देशमुख, नानाजी खांदवे, गजानन कडूकार, नरेंद्र कोंबे, महेंद्र धुरेड, प्रकाश नाकतोडे, पांडुरंग लांडगे, बल्लू जगताप, अमोल कापसे, माधव नेरकर, नरेंद्र देशमुख, दिनेश गुल्हाने, यादव धुरळे, अशोक गावंडे, विष्णूपंत ढाकूलकर, पिरखा पठाण, राजू गुगलिया, मनोज पानघरे, उत्तमराव पाटील, लालाजी गावंडे, जयवंत घोंगे, शरद परडखे, प्रकाश गायकवाड, मुकेश देशमुख, प्रफुल्ल शिरभाते आदींचा समावेश होता.
शेतकरी शवयात्रेसाठी बाभूळगावात सभा
By admin | Published: July 08, 2017 12:32 AM