भारतीय बौद्ध महासभा शाखेच्यावतीने माता रमाई यांचा स्मृतिदिनाचा ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रा. सिद्धार्थ गायकवाड होते. महासभेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत, भगवान इंगळे, सरचिटणीस रूपेश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला फोटोचे पूजन करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. डॉ. बनसोड यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत माता रमाईंचे फार मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले. त्यांनी माता रमाईचा संपूर्ण जीवन प्रवास प्रभावीपणे मांडला. प्रा. सिद्धार्थ गायकवाड यांनी विचार व्यक्त केले. संचालन डॉ. प्रशांत बागेश्वर, प्रास्ताविक शालीकग्राम गवई, तर आभार प्रा. अरविंद मनवर यांनी मानले. सरणताय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला मुंबईहून आंबेडकराईटचे हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. संदेश वाघ, तसेच मुंबई, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील ७५ च्या वर धम्म बांधवांची उपस्थिती होती. यशस्वितेकरिता तालुका कार्यकारिणीने परिश्रम घेतले.