बाजारपेठ बंद : ठाणेदाराकडून उद्धट वागणुकीचे प्रकरण आर्णी : येथील बाजार समितीचे संचालक आणि व्यापाऱ्याला ठाणेदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत येथील व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंद ठेऊन मुक मोर्चा काढला. तसेच तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. आर्णी येथील व्यापारी अमोल बेलगमवार यांच्याकडे चोरी झाली होती. या चोरीच्या तक्रारीवरून ठाणेदारांनी त्यांना शिवीगाळ करून तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला होता. या प्रकाराने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी घटनेचा निषेध म्हणून आर्णी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. तसेच आर्णी तहसीलवर मुक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आर्णी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सचिव अजय छल्लाणी, भिकुभाई पटेल, नितीन निनावे, संदीप लोळगे, विठ्ठल देशमुख, चिराग शहा, गोलु राठी, शीतल वर्मा, पवन बजाज, अमोल बेलगमवार, राजेश सरोदे, सचिन निकडे, अनिल बेलगमवार, अविनाश कोषटवार, अजय बनगिनवार, फैयाज सैयद, रवी बोरा, गजानन चौधरी, राजेंद्र नालमवार, छोटू देशमुख, अमीन इसानी, सुनील मांडेकर, नीलेश चिंतावार, प्रशांत लिंगावार, संजय बोरा, श्रीकांत काळे, महेंद्र मनवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यापासून तहसीलपर्यंत काढण्यात आलेल्या या मुक मोर्चात व्यापारी काळ््याफिती लावून सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
आर्णी येथे व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा
By admin | Published: April 19, 2017 1:20 AM