लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवशाहीला प्रवासी मिळावे यासाठी महामंडळाकडून त्रासदायक उपाय केले जात आहे. या प्रकारात प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर ‘लालपरी’ फलाटावर लागत असल्याने गर्दीतून प्रवासाची वेळ येत आहे. यवतमाळ आगाराने तर यात कळस गाठला आहे. सकाळी ५.३० वाजतानंतर संपूर्ण दिवसभर शिवशाहीशिवाय दुसरी बस सोडली जात नाही.वातानुकुलीत, आरामदायी, थेट प्रवास असा शिवशाहीचा प्रचार करण्यात आला. याच आधारे तिकीटही अगडबंब ठेवण्यात आली. इतर बसच्या तुलनेत दीडपट अधिक भाडे आकारून अधिक प्रवासी मिळविण्याचा केविलवाणा प्रयोग शिवशाहीच्या माध्यमातून केला जात आहे. वास्तविक या बसला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. अधिक भाडे, बसमधील अस्वच्छता, प्रवासाचा कालावधी इतर बस एवढा आदी कारणे यामागील सांगितली जातात. ऐनकेनप्रकारे प्रवासी मिळविण्यासाठी आटापीटा केला जात आहे. यवतमाळ आगारातून इतर बसेसच फलाटावर लावल्या जात नाही. कधीकधी तर शिवशाही एक किंवा दोन प्रवासी घेऊन मार्गावर निघतात. परिणामी प्रवाशांची पावले खासगी बसकडे वळतात.नागपूर, अमरावती मार्गावरील अवस्था सारखीच आहे. बाहेर आगारातून येणाºया ‘लालपरी’च प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. नेर, दारव्हा, पुसद, उमरखेड आदी ठिकाणाहून बसेस आधीच खचाखच भरून येतात. येथे बसस्थानकावर चिक्कार भरतात. काही बसमध्ये कोंबून प्रवासी नेले जातात. या बसचे भाडे कमी आहे, शिवाय मार्गात काही ठिकाणी थांबे आहे. प्रवास आरामदायी व सुखकर व्हावा यासाठी शिवशाहीसोबतच इतर बसेसही यवतमाळ आगारातून सोडल्या जाव्या, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.बे्रकडाऊन वाढलेशिवशाही मार्गात नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी प्रवाशांना दुसरी शिवशाही येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. काही प्रसंगी प्रवाशांना इतर बसमधून रवाना केले जाते. शिवाय या बसची गतीही कमी असल्याची ओरड खुद्द एसटी कामगारांमधून होत आहे. अनेकदा या बसेस निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने पोहोचत असल्याचे सांगितले जाते.
शिवशाहीसाठी प्रवासी वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:03 PM
शिवशाहीला प्रवासी मिळावे यासाठी महामंडळाकडून त्रासदायक उपाय केले जात आहे. या प्रकारात प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर ‘लालपरी’ फलाटावर लागत असल्याने गर्दीतून प्रवासाची वेळ येत आहे.
ठळक मुद्देयवतमाळ-नागपूर २८ फेऱ्या : बाहेर आगाराच्या ‘लालपरी’चा आधार