आरोग्य समिती : आठ तालुक्यातील उपकेंद्र यवतमाळ : जिल्ह्यातील १९ आरोग्य उपकेंद्र नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे. गुरूवारी समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव पारित करण्यात आला. आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीत असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे स्थलांतर करण्याबाबत चर्चा झाली. मुंबई येथील आरोग्य सेवा संचालकांनी याबाबत जिल्हा परिषदेला नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीत समाविष्ट असलेले आरोग्य केंद्र व उपकेंद्र योग्य गावांमध्ये स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात केली. यात बाभूळगाव येथील उपकेंद्र गवंडी, कळंब एक उपकेंद्र पिंपळगाव, कळंब दोन उपकेंद्र सावरगाव, झरीजामणीचे कोडपाखिंड, राळेगाव एक उपकेंद्र करंजी, राळेगाव दोन उपकेंद्र दहेगाव, महगाव उपकेंद्र सवना, आर्णीचे परसोडा, नवाबपूर उपकेंद्र ब्राम्हणवाडा पूर्व, नेर एक उपकेंद्र अडगाव, नेर दोन उपकेंद्र कामनदेव, वडगाव उपकेंद्र बोरीगोसावी, मुलकी उपकेंद्र बेलोरा, भोसा उपकेंद्र अकोलाबाजार, मोहा उपकेंद्र हातोला, लोहारा उपकेंद्र वडगाव पोलीस स्टेशन, वाघापूर उपकेंद्र यवती, उमरसरा एक उपकेंद्र उत्तरवाढोणा, तर उमरसरा दोन उपकेंद्र जवळगाव येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे.(शहर प्रतिनिधी) पाण्याचे ५0१ नमुने दूषित जिल्ह्यातील दोन हजार १९६ ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. त्यापैकी ५0१ ठिकाणचे पाणी दूषित आढळून आले. त्याची टक्केवारी २२ आहे. ब्लिचिंगच्या ४२६ पैकी ८८ नमुन्यात २0 टक्केपेक्षा कमी क्लोरीन आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थांना दूषित पाणी प्राशन करावे लागत असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील १९ आरोग्य उपकेंद्रांचे स्थलांतर
By admin | Published: August 05, 2016 2:20 AM