लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : उपविभागात सोयाबीन आणि कपाशीवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. आता ज्वारी पिकावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहे. कृषी विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.पुसद तालुका व उपविभागात गेल्या पंधरवड्यात संततधार पावसाने खरीप पिकांची हानी झाली. सोयाबीन व कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. सोयाबीनवर विविध अळ्यांनी हल्ला चढविला. अळ्यांमुळे कपाशीची पातीगळ सुरू झाली. आता खरिपातील ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्यांच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. अळ्यांना परतून लावण्यासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. तरीही ज्वारीचे पीक फस्त होत आहे.तालुक्यातील भडंगी तांडा, धनसिंगनगर, सांडवा, मांडवा आदी परिसरात ज्वारीवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी अनेकांनी ज्वारी पिकाकडे मोर्चा वळविला होता. मात्र धनसिंगनगर येथील अनिल राठोड यांच्या शेतातील दोन हेक्टरवरील ज्वारीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण पिकच नष्ट होत आहे. तालुका कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.याच परिसिरातील मोतीराम राठोड, सुनील राठोड, मांगीलाल राठोड आदी शेतकऱ्यांच्या शेतातही हीच स्थिती दिसून येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.विमा काढणाऱ्यांना नुकसान भरपाईतालुक्यातील ज्वारी पिकांवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी कबूल केले. लष्करी अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कृषी सहायकांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांची पाहणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचा विमा भरलेला आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची कारवाई केली जाईल, असेही बेरड यांनी स्पष्ट केले.
ज्वारीवर लष्करी अळींचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 2:00 AM
पुसद तालुका व उपविभागात गेल्या पंधरवड्यात संततधार पावसाने खरीप पिकांची हानी झाली. सोयाबीन व कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. सोयाबीनवर विविध अळ्यांनी हल्ला चढविला. अळ्यांमुळे कपाशीची पातीगळ सुरू झाली. आता खरिपातील ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्यांच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
ठळक मुद्देपुसद उपविभाग : शेतकरी चिंताग्रस्त, कृषी विभागासमोर उभे ठाकले आव्हान