गजानन अक्कलवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कळंब तालुक्यात शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.यावर्षी प्रथमच बहुतेक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेकडो परिसरातील कपाशीच्या संपूर्ण पिकांची वाताहत झाली. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर आता पाण्याअभावी रबी हंगामालाही शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील माटेगाव, परसोडी, सावरगाव, दहेगाव, चिंचोली, उमरी, बोरजई आदी भागातील नाल्यावाटे बेंबळाच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. अतिशय निकृष्ट कामामुळे शेतापर्यंत पाणीच पोहचत नाही. वितरीकेची स्थिती अतिशय नाजुक आहे. दरवर्षी शेतात पाणी घुसून नुकसान होण्याचे प्रमाण मोठे आहे. आता तर लाखो गॅलन लिटर पाणी नदी-नाल्यावाटे वाहून जात आहे. एकप्रकारे नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई, होणे अपेक्षित आहे, नागरिकांची तशी मागणीही आहे. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजुनही शेतापर्यंत पोहचलेच नाही.यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पार पितळ उघडे पडले़ अक्षम्य तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय? अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ परिणामी बेंबळा कालव्याच्याच विरोधात यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहे.दोषींवर कारवाईची मागणीचुकीचा सर्व्हेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. दर्जाहीन कामांमुळे धरणाच्या बांधकामांना अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही दिसून येते.बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेत जमीन वर आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंबधी अधिकाऱ्यांपुढे शेतकऱ्यांनी वेळोवेळी अडचणी मांडल्या़ परंतु कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही.यावर्षी बेंबळा धरणही केवळ २८ टक्केच भरले. धरणातील काही पाणी पिण्यासाठी राखिव ठेवण्यात आले. असे असताना हजारो गॅलन लिटर पाणी निरर्थक वाहत जाणे ही बाब अक्षम्य आहे. त्यामुळे या प्रकाराला दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज आहे. यासंदर्भात बेंबळाचे उपअभियंता प्रशांत पिंगळे यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सावरगाव परिसर माझ्याकडे नाही. नगराळे साहेबांकडे हा परिसर येतो. त्यांना या प्रकाराची माहिती देऊन दखल घेण्यास सांगतो.
यवतमाळच्या बेंबळामध्ये लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:13 PM
बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कळंब तालुक्यात शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.
ठळक मुद्देनिकृष्ट कामाचा परिणाम लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही झाली घोर निराशा