लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : बाभूळगाव ते यवतमाळ रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला नवीन वृक्ष लागवड केली गेली. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यात बाभूळगाव-गिमोणा-राणी अमरावती बसस्थानान, अंतरगावपर्यंत शासनाने डांबर रस्त्याच्या दुतर्फा लाखो रुपये खर्चून वृक्ष लागवड केली. सदर झाडे अंदाजे दोन वर्षांची झाली. याचवेळी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले. त्यासाठी इंग्रजकालीन मोठमोठ्या झाडांवर आरा फिरवला गेला. आता लगतची कोवळी झाडे जेसीबीच्या पंजातून सुटणार नाही, हे जवळपास निश्चित झाले. त्यामुळे शासनाचा लाखो रुपये वृक्ष लागवडीवरील खर्च पाण्यात जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.नियोजनाअभावी हे नुकसान होत आहे. आता कुणावर जबाबदारी निश्चित केली जाते, हाच खरा प्रश्न आहे. रस्ता रुंदीकरणापूर्वी दोन वर्षांआधी बाजूला वृक्ष लागवड केली होती. ती झाडे आता कोवळए आहे. मात्र रुंदीकरणात त्यांचाही बळी जाणार आहे. आधीच नियोजन केले असते, तर कदाचित वृक्ष लागवडीवरील लाखोंचा खर्च वाचविता आला असता. मात्र शासन आणि प्रशासनाच्या नियोजनाअभावी हा खर्च पाण्यात जाणार आहे.
वृक्ष लागवडीवरील लाखो रुपये पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:14 PM
बाभूळगाव ते यवतमाळ रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला नवीन वृक्ष लागवड केली गेली. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देबाभूळगाव-यवतमाळ : रस्ता रूंदीकरणाचे काम, निर्दयीपणे फिरवला जेसीबी