शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

आजपासून मिनी लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:00 AM

नव्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा आणि उपक्रम यांना कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या तब्बल २७ सेवांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. या सेवा देताना काही बाबींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकठोर निर्बंध : बाहेर पडणे महागात पडेल, जीवनावश्यक वस्तूंना सूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा वाढता विळखा पाहता राज्य शासनाने बुधवारी रात्री ८ वाजतापासून १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. या आदेशात अनेक अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठ बंद व बाहेर फिरण्यावर निर्बंध अशा स्वरूपाची ही संचारबंदी असणार आहे. ब्रेक द चेन अंतर्गत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. नव्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा आणि उपक्रम यांना कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या तब्बल २७ सेवांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. या सेवा देताना काही बाबींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षामध्ये एक चालक दोन प्रवासी, चारचाकी वाहनात एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी तर एसटी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करता येणार आहे. १४ प्रकारची सर्व कार्यालये, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना सुरू ठेवण्यात येणार आहेत. यात बँकांसह विमा व औषधी उत्पादन, पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. रेस्टाॅरन्ट, बार आणि हाॅटेल्स पार्सल सुविधेच्या तत्त्वावर सुरू ठेवण्यास परवानगी आहे. रस्त्याच्या लगतच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल सेवा देता येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 

 वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके वितरण सुरू   वर्तमानपत्र, मासिक, नियतकालिकांची छपाई व वितरणास मुभा देण्यात आली आहे. वर्तमानपत्र हे घरोघरी पोहोचविण्यासही सूट देण्यात आली आहे. वर्तमानपत्र वितरित करणाऱ्या सर्व व्यक्तींना पात्रतेनुसार लवकरात लवकर लस घेणे आवश्यक आहे. शेतीविषयक कामे राहणार सुरळीत  शेतीची चालणारी कामे सुरू राहावी यासाठी बियाणे, खते, शेती उपकरणांची विक्री व दुरुस्ती सुरू ठेवली आहे. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, खाद्य पदार्थ दुकाने, सार्वजनिक बसेस, सर्व वस्तूंची आयात-निर्यात सुरू राहणार आहे.

दुकाने, माॅल्स, सलून, धार्मिक स्थळे, शाळा बंद  पूर्वीचे निर्बंध आदेशातही कायम आहे. चित्रपटगृह, दुकाने, माॅल्स, शाॅपिंग सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. धार्मिक स्थळेही बंद राहणार आहेत. सलूनची दुकाने, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा पर्यवेक्षकांना प्रमाणपत्राची सक्ती  परीक्षेकरिता नियुक्त असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण आवश्यक आहे. ४८ तासाच्या आतील  तपासणी पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्नाला २५ व्यक्तींची मर्यादा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या