लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : घनदाट जंगलाने व्यापलेल्या पुसद वन परिक्षेत्रात गत काही महिन्यांपासून गौण खनिजाआड सागवान तस्करी सुरू आहे. मुरुम, गिट्टीच्या वाहतुकीआड चक्क सागवान तोडून नेले जात आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेले वनौपज तपासणी नाके कुचकामी ठरल्याने सागवान तस्करांचे चांगलेच फावत आहे.पुसद वनपरिक्षेत्रअंतर्गत मोठ्या प्रमाणात सागवान आहे. या सागवानाच्या रक्षणासाठी वन विभागाची मोठी फौज आहे. फिरत्या पथकासह ठिकठिकाणी वनौपज तपासणी नाके तयार करण्यात आले आहे. याउपरही सागवान तोड थांबायला तयार नाही. मराठवाडा आणि तेलंगणातील तस्कर जंगलात शिरुन स्थानिकांच्या मदतीने सागवान तोड करतात. काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात सागवान तोडीचा प्रकार उघडकीस आला होता. उमरखेड येथे एका वाहनाची पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यात सागवान आढळून आले होते. आता तर सागवान तस्करांनी नवीन शक्कल लढविली आहे. जंगलातून गौण खनिज वाहतूक करताना वाहनामध्ये सागवान टाकले जाते. त्यानंतर त्यावर मुरुम अथवा लालमाती टाकून बिनधास्त वाहन जंगलाबाहेर काढले जाते. विशेष म्हणजे हा प्रकार वन कर्मचाऱ्यांना माहीत असला तरी वरिष्ठांच्या दबावापोटी ते कुणावरही कारवाई करीत नाही.पुसद वनपरिक्षेत्रात सहज फेरफटका मारला तरी तुटलेल्या सागवानाचे थुटे दिसून येतात. विशेष म्हणजे रस्ता सोडून आतमध्ये हा प्रकार दिसून येतो. यातून अनेक वन कर्मचाऱ्यांनी आपले चांगभलं करून घेतले आहे. वनउपज तपासणी नाक्यांचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणतीही सुविधा नसते. त्यातच महिला कर्मचाऱ्यांची अनेकदा नियुक्ती केली जाते. सुरक्षेअभावी आणि सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी त्या ठिकाणी थांबण्यास तयार नसतात. याचाच फायदा वनतस्कर घेत आहेत. दुसरीकडे वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी वन विभागावर आहे. परंतु यातही वन विभाग कमी पडत आहे. पानवठ्याअभावी तहानलेले जीव मृत्युमुखी पडत आहे. तर काही प्राणी शिकाºयांचे सावज ठरत आहे. वरिष्ठांनी पुसद वनपरिक्षेत्रात फेरफटका मारल्यास संपूर्ण गौडबंगाल बाहेर येऊ शकते.मराठवाड्यातील तस्कर सक्रियपुसद तालुक्याच्या शेवटच्या भागाला मराठवाड्याची सीमा लागून आहे. खंडाळा परिसरातून मराठवाड्यातील तस्कर जंगलात शिरतात. स्थानिकांच्या मदतीने सागवानाची तोड केली जाते. यातून अनेक तस्कर मालामाल झाले आहेत. वन विभागातील काही कर्मचाºयांचे त्यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही.
गौण खनिजाआड सागवान तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:41 PM
घनदाट जंगलाने व्यापलेल्या पुसद वन परिक्षेत्रात गत काही महिन्यांपासून गौण खनिजाआड सागवान तस्करी सुरू आहे. मुरुम, गिट्टीच्या वाहतुकीआड चक्क सागवान तोडून नेले जात आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेले वनौपज तपासणी नाके कुचकामी ठरल्याने सागवान तस्करांचे चांगलेच फावत आहे.
ठळक मुद्देपुसद उपविभाग : वनौपज तपासणी नाके कुचकामी