शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

उमरखेडच्या सहा हेक्टर वनजमिनीत गौण खनिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:38 PM

पुसद वन विभागांतर्गत उमरखेड वन परिक्षेत्रातील मौजे चुरमुरा परिसरात सहा हेक्टर वनजमिनीत कंत्राटदारांनी अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याची बाब भूमिअभिलेखच्या मोजणीत सिद्ध झाली आहे.

ठळक मुद्देभूमिअभिलेख मोजणीत सिद्ध : वन-महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पुसद वन विभागांतर्गत उमरखेड वन परिक्षेत्रातील मौजे चुरमुरा परिसरात सहा हेक्टर वनजमिनीत कंत्राटदारांनी अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याची बाब भूमिअभिलेखच्या मोजणीत सिद्ध झाली आहे. खुद्द वन अधिकारी व कर्मचारीसुद्धा या मोजणीचे साक्षीदार आहेत. आता पुसदचे डीएफओ अरविंद मुंढे गौन खनिज उत्खनन करणाºया कंत्राटदारांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.पुसद वन विभागात अवैध उत्खननाबाबत ओरड आहे. काही महिन्यांपूर्वी एका कंपनीने चक्क वन हद्दीतून परस्परच खोदकाम केले होते. आधी खोदकाम नंतर परवानगी असा तो प्रकार होता. त्याची चर्चा सुरू असतानाच आता उमरखेड वनपरिक्षेत्रात तब्बल सहा हेक्टर वनजमिनीत गौण खनिजासाठी परस्पर उत्खनन झाल्याचा प्रकार पुढे आला. भूमिअभिलेख विभागाने त्यासाठी मोजणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी मळघणे, वनसर्वेअर एम.डी. सरगर, एस.व्ही. राहूळकर, क्षेत्र सहायक पी.ए. पोहेकर, वनरक्षक बी.आर. भोरगे, विजय राठोड, नामदेव जाधव, प्रतीक रुढे हे या मोजणीचे साक्षीदार आहेत. या मोजणीमध्ये बांधकाम कंत्राटदारांनी सुमारे सहा हेक्टर वन जमिनीवर उत्खनन केलेले असल्याचे आढळून आले. या उत्खननातून लाखो रुपये किंमतीचा गौण खनिज काढला गेला. वन जमिनीत अनेक महिन्यांपासून गौण खनिज उत्खनन सुरू असताना वन तसेच महसूल खात्याचे अधिकारी-कर्मचारी नेमके होते कुठे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक जी.टी.चव्हाण यांच्यापर्यंत हे प्रकरण जाऊनही अद्याप गौण खनिज उत्खनन करणाºया कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या कारवाईसाठी आता पुसद डीएफओ आणि एसडीओंकडे नजरा लागल्या आहेत.वननियमांचा भंगवन जमिनीतील या उत्खननामुळे वनसंवर्धन अधिनियम १९८० चा भंग झाला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी-कर्मचाºयाविरुद्ध शिस्तभंग कारवाई अपेक्षित आहे. उमरखेड तालुक्यात महसूल व वन प्रशासनाच्या दुर्लक्षाने सरकारी जमिनीवर अवैध उत्खननाचा हा प्रकार नवीन नाही. २०१४ मध्ये विधीमंडळात हे उत्खनन गाजले होते. मात्र त्यानंतरही दंडाच्या रकमेची वसुली केली गेली नव्हती. आताच्या प्रकरणात कंत्राटदारांवर कारवाई व त्यांच्या मशिनरीजची जप्ती होणे अपेक्षित आहे.