यवतमाळ : जिल्ह्यात गौण खनिजाची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात हे उघड झाले आहे. वर्षभरात दीड कोटींच्या घरात गौण खनिजाची चोरी झाली असून पैकी ४९ प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.जिल्ह्यातील काही रेती घाटांचा लिलाव झाला, तर काहींचा झालेला नाही. अशा रेती घाटांमधून मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी होत आहे. सोबतच मुरूम, डोलोमाईटसुद्धा चोरून नेले जात आहे. जानेवारीपर्यंत जिल्ह्यात अवैध गौण खनिज चोरीची एक हजार ७३ प्रकरणे उघड झाली. सर्वाधिक १५५ प्रकरणे यवतमाळात आहेत. या प्रकरणांत एक कोटी ५१ लाख ८० हजार ८०५ रूपयांचा दंड वसूल केला आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात गौण खनिजाची चोरी
By admin | Published: February 23, 2017 4:10 AM