ठळक मुद्देनवनियुक्त आमदार : मराठीतून शपथ
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानपरिषदेचे नवनियुक्त सदस्य काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अॅड. नीलय नाईक यांनी सोमवारी विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली.नवनियुक्त ११ आमदारांचा शपथविधी विधान परिषदेत पार पडला. यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मावळते उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, शेकापचे नेते जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मिर्झा व अॅड. नाईक आमदार म्हणून पहिल्यांदाच सभागृहात आले. या दोघांनीही मराठीतून शपथ घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील पुसदला एक नव्हे तर दोन वेळा लॉटरी लागली. डॉ. वजाहत मिर्झा यांच्या शपथविधीला त्यांची आई अतिया, पत्नी मोना, भाऊ सज्जाद, बहीण डॉ. अस्मा काझी, काका के.आय. मिर्झा तसेच माजी आमदार विजयराव खडसे, माजी सभापती तातू देशमुख, रमेश चव्हाण, महेश खडसे, सय्यद इर्शाद अली, मकसूद अली आदींची उपस्थिती होती. अॅड. नीलय नाईक यांच्या शपथविधीसाठी त्यांच्या परिवारातून पत्नी डॉ.सौ.सुजाता नाईक, जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, त्यांचे बंधू आदित्य नाईक, अजिंक्य नाईक, तसेच पुसद विभागातील सुशील पवार, विनोद जिल्हेवार, निखील चिद्दरवार, महेश नाईक, दीपक काळे, नीळकंठराव पाटील, विश्वास भवरे, एस.जी. देशमुख, नीरज पवार, अक्षर कपाडिया, अमोल उबाळे, ओमप्रकाश शिंदे, जुनेद खान, विवेक पवार, राहुल पवार, प्रतीक पाटील, शंकर चव्हाण, मोतीराम राठोड, विजय भेलगे, किसन मडघणे, सुधाकर कांबळे, आनंद चौधरी, आशिष कदम, सूरज गिºहे, विक्की बरडे आदी उपस्थित होते.मिर्झा, नाईकांचा मुंबईत शपथविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 9:57 PM