लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन वर्षांपूर्वी हमी भावानुसार तूर, चना, सोयाबीन खरेदी करताना दिल्या गेलेल्या पेमेंटमध्ये यवतमाळात गैरव्यवहार झाल्याची तक्रार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पणन महासंघाकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा मार्केटिंगच्या तत्कालीन अधिकाºयाची चौकशी नांदेडच्या पणन अधिकाºयाकडे सोपविण्यात आली आहे.यवतमाळचे तत्कालीन प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी.जे. गावंडे यांच्या कार्यकाळात २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये नाफेडच्यावतीने वणी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीमार्फत आधारभूत किंमतीनुसार तूर, चना, सोयाबीनची खरेदी करण्यात आली होती. या खरेदीसाठी अनुषंगिक खर्चाची रक्कम सदर संस्थेला व अन्य संस्थांना देताना तसेच वाहतूकदारांना अग्रीम रक्कम देताना अनियमितता झाल्याचे दिसून आले.याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पणन महासंघाकडे लेखी तक्रार केली. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळातील मार्केटिंगच्या दोन वर्षातील व्यवहार व कारभाराची प्राथमिक चौकशी करण्यासाठी नांदेड येथील जिल्हा पणन अधिकारी आर.बी. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्केटिंग फेडरेशनचे मुंबई येथील सरव्यवस्थापक (प्रशासक) यांनी १२ डिसेंबर रोजी या चौकशीचे आदेश जारी केले आहे.यवतमाळ जिल्हा पणन कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सखोल चौकशी करावी व प्राथमिक चौकशी अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश नांदेडच्या शेख यांना देण्यात आले. या चौकशीत नेमके किती व काय निष्पन्न होते, याकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.चौकशी थेट नांदेडकडेबी.जे. गावंडे यांच्याकडे प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी पदाचा कारभार होता. मात्र संशयास्पद कारभारामुळे गावंडे यांच्याकडील प्रभार काढून घेण्यात आला. तो प्रभार सहायक निबंधक (प्रशासन) अर्चना माळवे यांच्याकडे देण्यात आला आहे.
तूर, हरभरा, सोयाबीनच्या खरेदीत झाला गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:35 PM
दोन वर्षांपूर्वी हमी भावानुसार तूर, चना, सोयाबीन खरेदी करताना दिल्या गेलेल्या पेमेंटमध्ये यवतमाळात गैरव्यवहार झाल्याची तक्रार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पणन महासंघाकडे केली आहे.
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांची तक्रार : मार्केटिंग अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात