रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाचे चुकारे अदा करताना शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे सक्तीचे आहे. या नव्या आदेशामुळे खरेदी झालेल्या कापसाचे २१ कोटी रुपयांचे चुकारे मात्र थांबले आहेत. यातून बँकेच्या कामकाजात वाढ झाली आहे. वाढीव कामामुळे बँकांनी कामाची गती मंद केली आहे. यातून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक करण्याच्या सूचना पणनने दिल्या आहेत. चुकारे अदा करताना बँक खाते आधारशी लिंक झाले किंवा नाही याची खात्री केली जात आहे. बँक स्तरावर ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय मंद गतीने राबविली जात आहे.कापूस विकल्यानंतर १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटल्यांनतरही आधार जोडण्याची प्रक्रिया बँकांनी पूर्ण केली नाही. यामुळे शेकडो क्विंटल कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही जमा झाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पणन महासंघाचे कार्यालय आणि बँक स्तरावर सतत पाठपुरावा सुरू केला आहे. यानंतरही कामाची गती ‘जैसे थे’ आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे फेडरेशनकडे येणाºया व्यापाऱ्यांच्या गाड्या थांबल्या आहेत. यासोबत काही शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक नसल्याने शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे.खरेदी १३२ कोटींची, चुकारे १११ कोटींचेपणन महासंघाने जिल्ह्यात १३२ कोटींच्या कापसाची खरेदी केली. त्यापैकी १११ कोटी रूपयांच्या कापसाचे चुकारे शेतकºयांच्या खात्यात वळते झाले आहेत. २१ कोटी रूपयांच्या कापसाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वळते झाले नाहीत.शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत. ही प्रक्रिया बँक स्तरावर युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. लवकरच चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होतील.- चक्रधर गोस्वामीविभागीय व्यवस्थापक,पणन महासंघ, यवतमाळ
आधार लिंक नसल्याने अडकले कापसाचे २१ कोटींचे चुकारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 6:00 AM
कापूस विकल्यानंतर १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटल्यांनतरही आधार जोडण्याची प्रक्रिया बँकांनी पूर्ण केली नाही. यामुळे शेकडो क्विंटल कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही जमा झाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पणन महासंघाचे कार्यालय आणि बँक स्तरावर सतत पाठपुरावा सुरू केला आहे.
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : नव्या आदेशाने बँकांच्या कामकाजात वाढ