आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बहुचर्चित बदल्या उरकण्याची धडपड मंत्रालय स्तरावरून सुरू असली, तरी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मात्र अद्यापही सुस्त आहे. थेट मुंबईतून निर्देश येऊनही बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. याद्या पाहण्यासाठी शिक्षक मात्र जिल्हा परिषदेभोवती घिरट्या घालत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या टळल्या आहे. आता कोणत्याही स्थितीत ३१ मेपर्यंत जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे नियोजन ग्रामविकास विभागाने जाहीर केले. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेची आॅनलाईन संचमान्यता मिळण्याची गरज आहे. शाळांनी संचमान्यता केंद्रप्रमुख स्तरावर फॉरवर्ड केलेल्या असल्या, तरी केंद्रप्रमुखांनी अद्यापही शिक्षणाधिकाºयांकडे त्या फॉरवर्ड केलेल्या नाहीत. तर दुसरीकडे दोनच दिवसात संचमान्यता करून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनही करण्याचे निर्देश ग्रामविकास सचिवांनी दिले आहेत. हे निर्देश जिल्ह्यात धाब्यावर बसविण्यात आले आहेत.बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर होण्याची शिक्षकांना प्रतीक्षा आहे. परंतु, केंद्रप्रमुखांनी अडवून ठेवलेल्या संचमान्यता मिळविण्यासाठी जिल्हास्तरावरून कोणत्याही हालचाली दिसत नाही. जानेवारीमध्येच संचमान्यता व समायोजन आटोपून फेब्रुवारीच्या प्रारंभी बदली प्रक्रिया सुरू करण्याचे ग्रामविकासचे नियोजन शिक्षण विभागाच्या सुस्तीमुळे धुळीस मिळण्याची शक्यता आहे.सचिव घेणार आढावाआता या शिक्षक बदली प्रक्रियेचा आढावा ग्रामविकास विभागाचे सचिव २९ जानेवारीला घेणार आहे. या आढाव्यात विविध मुद्यांबाबत ते शिक्षण विभागाला धारेवर धरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभाग खानापूर्ती करण्यात व्यस्त आहे.
शिक्षक बदल्यांसाठी घाई गडबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:23 PM
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बहुचर्चित बदल्या उरकण्याची धडपड मंत्रालय स्तरावरून सुरू असली, तरी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मात्र अद्यापही सुस्त आहे.
ठळक मुद्देशिक्षण खाते सुस्त : संचमान्यता, समायोजनासाठी वरिष्ठस्तरावरून दबाव